प्रहारच्या आंदोलनाचा दणका कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कारवाई सुरु ...

 प्रहारच्या आंदोलनाचा दणका  

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील

 प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कारवाई सुरु ...

प्रहार जन शक्ती पक्षाच्या वतीने कुरकुंभ वसाहतीतील कंपन्या मधील रसायनमिश्रीत पाण्यापासुन होणारे प्रदूषण रोखण्यासाठी १८ऑक्टोबर २०२१ रोजी अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने काही दोषी कंपन्यावर कारवाई सुरु केली आहे. उर्वरीत प्रदूषण करणाऱ्या सर्व कंपन्यावर १५ दिवसांच्या आत कारवाई करू असे लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे १८ ऑक्टोबर २०२१ रोजी होणारे अन्नत्याग आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाने तात्पुरते मागे घेतले आहे. 

प्रदूषण करणाऱ्या कंपनीची लिस्ट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडाळाकडे दिली होती.

प्रहार जन शक्ती पक्षाचे अन्नत्याग आंदोलन करण्याबाबतच्या पत्रामध्ये उल्लेखलेल्या उदयोगांवर खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. त्याची माहिती खालील प्रमाण


जल प्रदूषण (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) कायदा, १९७४, हवा प्रदूषण (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) कायदा १९८१ अन्वये वैयाक्तिक सुनावणी घेवून अंतरीम निर्देश दिलेल्या खाली ल उद्योगांची


१ ) रामकमल केमिकल्स ( प्रा .) लि

 २) अल्काईल अमाईन केमिकल्स लि .

 ३ ) हॉनर लॅब लि.

४) इटरनिस फाईन केमिकल 

५) हार्मनी ऑर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेड

६) पाटीदार इंडस्ट्रीज

तसेल जल प्रदूषण (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) कायदा, १९७४, हवा प्रदूषण (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) कायदा १९८१ अन्वये मेलजर केमिकल प्रा.लि. या कंपनीला कारणे दाखवा नोटिस दिली आहे.


ज्या कंपन्या प्रदूषण करत आहे त्या दोषी कंपन्यावर कारवाई केली नाही तर पुन्हा प्रहार जन शक्ती पक्षाच्या वतीने राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदशा खाली तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रहार जन शक्ती पक्षाचे अध्यक्ष रमेश शितोळे - देशमुख यांनी दिली .









टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler