शेतमालाची वाहतूक करणारी वाहन अडवू नये.....
प्रहार जनशक्ती पक्ष शेगावची मागणी ठाणेदारा मार्फत पोलिस अधीक्षकांना निवेदन.......
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो.न.8308264808
सध्या शेतकऱ्यांचा शेतमाल निघायला सुरवात झाली असून तो विक्रीकरीता शहरात किंवा परिसरातील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार संकुलामध्ये नेल्या जातो. आधीच कोरोना व मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी पूर्ता हैराण झाला असताना त्यांना महामार्ग पोलिस तसेच स्थानीक वाहतूक पोलिस त्यांना अडवून दंड आकारत असल्याच्या अनेक मौखिक तक्रारी शेतकरी, वाहन चालक तथा पक्षाच्या कार्यकर्त्या कडून पक्षाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामूळे आपल्या अधिनस्त असलेल्या जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन, वाहतूक विभाग व महामार्ग पोलिस यांना सुचना देवून शेतकऱ्यांना होत असलेला त्रास थांबवावा. तसेच सध्या पावसाच्या भीतीने काही दिवसापूर्वी झालेल्या पावसातून कसे बसे शिल्लक राहिलेले पिक पुन्हा खराब होवु नये म्हणुन शेतकरी जिल्हातून तसेच जिल्ह्याबाहेरील शेतमजुर पिक कापणी करता आणत आहे त्यामुळे वाहनांना ही शिथिलता देण्यात यावी एवढीच विनंती.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहारसेवक आशिष घुमे व अक्षय बोंदगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहारसेवक अमोल दातारकर, राकेश भुतकर, धीरज झाडे, राहुल कोसुरकर, आशिष कोटकर, प्रथमेश जयस्वाल, आकाश नाकाडे व इतर सदस्य उपस्थित होते.