अबबब हे काय....सेंटर मागितल नागपूर मिळालं नाशिक आरोग्य विभागाच्या भरतीचा गोंधळ थांबता थांबेना

अबबब हे काय....सेंटर मागितल नागपूर मिळालं नाशिक आरोग्य विभागाच्या भरतीचा गोंधळ थांबता थांबेना

वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058


आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील गोंधळ संपण्याचे नाव घेत नाहीये. येत्या 25 आणि 26 तारखेला आरोग्य विभागाची गट क आणि ड संवर्गाची परीक्षा होणार आहे. मात्र, ही परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्याच्या प्रेवशपत्रावर तसे नमूद करण्यात आहे. परीक्षा ही महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाची आहे. मात्र परिक्षार्थीला परीक्षा केंद्र थेट उत्तर प्रदेशातील मिळाले आहे. सरकारच्या या अजब कारभारामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला आहे.

विद्यार्थ्याला थेट उत्तर प्रदेशचे परीक्षा केंद्र

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी 25 सप्टेंबर आणि गट ड संवर्गातील पदासाठी 26 सप्टेंबर 2021 रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार होती. त्यासाठी उमेदवारांचे प्रवेशपत्रदेखील वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. मात्र दत्ता पतुरकर या परीक्षार्थीला परीक्षा केंद्र थेट उत्तर प्रदेश राज्यातील मिळाले आहे. हा अजब प्रकार समोर आला.

25 सप्टेंबर ची होणारी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्यानंतर आता 25 ऑक्टोबर ला होणाऱ्या परीक्षेसाठी ही तोच गोंधळ असल्याचे दिसून येत आहे.वरोरा येथील एका परीक्षार्थी ने  परीक्षेसाठी नागपूर सेंटर  मागितले असताना देखील हॉल तिकिट वर नाशिक येथील परीक्षा केंद्र देण्यात आल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू शकतो या प्रकरणी त्या विद्यार्थ्यांची अडचण दूर करावी अशी मागणी विद्यार्थी करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler