आनंद निकेतन महाविद्यालयातील उन्नत भारत अभियान आणि राष्ट्रीय सेवा योजना पथकांने डोंगरगाव.(रेल्वे) येथे स्वच्छ भारत अभियान संपन्न
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार च्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 या काळात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे, त्याचाच भाग म्हणून, महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा व्दारा संचालित तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित. आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन. वरोरा. येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि उन्नत भारत अभियान अंतर्गत ग्रामपंचायत, डोंगरगाव. (रेल्वे) ता. वरोरा. यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत दिनांक २२ आक्टोबर २०२१ ला सकाळी १० वाजता डोंगरगाव.(रेल्वे) या गावात स्वच्छ भारत अभियानावर जनजागृती रॅली काढण्यात आली व परिसर व मदिराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना पथकांचे १६ स्वयंसेवकाने स्वच्छ भारत मिशन योग्य रीतीने पार पाडले. समाजातील विविध प्रदूषण थांबवून पर्यावरणाचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहेत. हे लक्षात घेऊन पर्यावरणातील जीव वाचवण्यासाठी तथा पर्यावरणचे संवर्धनासाठी राष्ट्रीय सेवा योजना पथकांचे स्वयंसेवकांनी स्वच्छ भारत अभियान हि मोहीम राबविली व पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. मृणाल काळे. राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख तथा कार्यक्रम अधिकारी मा. डॉ. रंजना लाड., सह कार्यक्रम अधिकारी मा. डॉ. नरेंद्र पाटील., मा. डॉ. प्रमोद सातपुते., प्रा. संदिप ताजने., ग्रामपंचायत डोंगरगाव(रेल्वे) चे सरपंच सौ. इंदुबाई रा. खिरटकर.,सदस्य सौ. मंगला च. घुगल., सदस्य श्री. विकास ल. कोडापे. सदस्य सौ. नंदा ता. आपटे., ग्रामपंचायत डोंगरगाव (रेल्वे) चे सचिव/ ग्रामसेवक मा. कविता रं. सोनार, संगणक परिचालक सौ. स्मिता र. साळवे,शिपाई श्री. राजु ठाकुर., अंगणवाडी सेविका सौ. सरला नक्षिने, तथा राष्ट्रीय सेवा योजना पथकांचे स्वयंसेवक हितेश घुगल, शुभम आमने, भुषण येडे, संकेत कायरकर, सोनाली क्षिरसागर, निकिता माणुसमारे, आरती इंगळे, अल्का चौधरी, पायल कामडी, जिज्ञासा लोडे़, रिना शेरकी, शिल्पा खैरे, कल्याणी कारवटकर, मनस्वी अंबाडे, प्रतिक्षा येवले, सोनाली दडमंल, पल्लवी दडमल या सर्वांनी उपस्थित राहून आपले कर्तव्य पार पाडले.