बळीराजास अनाहुत पञ
--------------------------------
समाधान बंगाळे
।तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा
मला विद्यमान व्यवस्थेची चिड तर येतेचं पण त्याही पेक्षा बळीराजा तुझी चिड त्याही पेक्षा किती पटीने येते कारण स्वातंञ्य प्राप्तीपासून कित्येक सरकारे आले आणि गेली परंतु तुझा आणि तुझ्या व्यवसायाचा ऊत्क्रर्ष आजतागायत कधीचं पहायला मिळाला नाही.आज सत्तेच्या विरोधात असणारे पक्ष तुझ्या दु:खाचे भांडवल करून जेव्हा सत्ता हस्तगत करतात तेव्हा हेचं लोक तुझ्या विरोधात कलम कसायाच्या भुमिका राबवितात!तरी तु जगाचा पोशिंदा म्हणविणारा वास्तवाचे भान ठेवून शहाणा कधी होणार म्हणून मी माझ्यासारखे जे कोणी असतील ते तुझी शहाणा होण्याची वाट आतुरतेने बघताय!
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांतभाऊ तुपकर हा एकमेव माणूस मागच्या सरकारमध्ये तुम्ही आम्ही पाहीला असेल की,श्रीमान राजु शेट्टीनीं रविकांत हे शेतकरी विरोधी सरकार आहे म्हणून त्वरीत राजीनामा दे आणि रविभाऊंनी तात्काळ मंञीपदाचा राजीनामा दिला आणि मंञीपदाला लाथ मारली.
आज संपुर्ण महाराष्ट्राच्या शेतकय्रांवर अस्मानी संकट कोसळले आहे.अस्मानी संकटापुढे कुठलाही जीव हतबल असतो परंतु सुलतानी संकटाला माणसांनी जर मनावर घेतले तर त्याला निश्चितचं ऐसन घातल्या जावू शकते.आता तुम्ही म्हणालं सुलतानी संकट कोणते तर ते म्हणजे दहा -बारा हजाराच्या दराने विकली जाणारी सोयाबीन लगेचं जादुची कांडी फिरवावी तर ती लगेचं चार-पाच हजारावर यावी अशा होण्यामागचे कारण सरकारचे आयात-निर्यात धोरण आहे.म्हणून आदरणीय शरद जोशींनी म्हटले होते की,सरकारचे धोरण शेतकय्राचे मरण तरी बळीराजा शेतकय्राचा माल बाजारात येतो त्यावेळेस हे आयात धोरण का राबविले जाते असे एखाद्या तरी लोकप्रतिनिधींनी म्हटले आहे का किंवा याला विरोध केला आहे का?म्हणून आता तुचं बळीराजा सोड यांचा नाद आणि घे आता हातात वंदनीय फुल्यांचा आसुड आणि विचार यांना जाब कारण तुचं आहे आता तुझा उद्धारकर्ता आणि आठव माननीय शरद जोशींचे शब्द भिक नको हवे घामाचे दाम आणि मार आता लाचारीला लाथ.
आदरणीय शरद जोशी यांच्या शेतकरी चळवळीचा एक घटक,विचारवंत,अभ्यासक
रमेश ञ्यंबक बंगाळे रा.शिंदी ता.सिंदखेडराजा जि.बुलडाणा-9356567231