शेतमालाची वाहतूक करणारे वाहन अडवू नका प्रहार जनशक्ती पक्षाचे पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा :- सध्या शेतकऱ्यांचा शेतमाल निघायला सुरवात झाली असून तो विक्री करीता शहरात किंवा परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार संकुला मध्ये नेल्या जातो .आधीच कोरोना व मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे .त्या मुळे शेतकरी पूर्ता हैराण झाला असताना. महामार्ग पोलिस तसेच स्थानीक वाहतूक पोलिस त्यांना अडवून दंड आकारत असल्याच्या अनेक मौखिक तक्रारी शेतकरी , वाहन चालक तथा पक्षाच्या कार्यकर्त्या कडून पक्षाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामूळे आपल्या अधिनस्त असलेल्या जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन , वाहतूक विभाग , महामार्ग पोलिस यांना सुचना देवून शेतकऱ्यांना होत असलेला त्रास थांबवावा. तसेच सध्या पावसाच्या भीतीने काही दिवसापूर्वी झालेल्या पावसातून कसे बसे शिल्लक राहिलेले पिक पुन्हा खराब होवु नये म्हणुन शेतकरी जिल्हातून तसेच जिल्ह्याबाहेरील शेतमजुर पिक कापणी करता आणत आहेत. त्या वाहनांना ही शिथिलता देण्यात यावी याकरिता चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख रुग्ण मित्र गजुभाऊ कुबडे यांच्या मार्गदर्शनात व प्रहार सेवक आशिष घुमे यांच्या नेतृत्त्वात निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले . यावेळी प्रहार सेवक किशोर डुकरे , पिंटू वासेकर, ओंकार कांबळे , ग्रामपंचायत सदस्य हर्षद ढोके , प्रमोद देठे , प्रफुल गारघाटे, निखिल कांबळे . सौरभ दावगावकर उपस्थीत होते .