वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती ठरत आहे शेतकर्यासाठी वरदान

वरोरा कृषी उत्पन्न बाजार  समिती ठरत आहे  शेतकर्यासाठी वरदान 


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे


चंद्रपूर जिल्हातील एकमेव 

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती असे काही उपक्रम घेऊन शेतकऱ्यांना देत आहे चेक स्वरूपात आर्थिक मदत. 

दोन दिवसा अगोदर  झालेल्या पाऊस आणी विजांचा कडकडाट या सह झालेल्या  पाऊसामध्ये कोटबाला येथील शेतकरी श्री हेमंत भास्कर उरकांडे हा व्यक्ती आपल्या शेतात काम करीत असताना अचानक दुपारी विजांचा कडकडाट सुरु झाला त्या मध्ये त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला, 

कोटबाला येथील शेतकरी याचा मृत्यू झाला हि बाब कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री हरीश जाधव यांना माहित झाली. 

त्यानी झालेली गोष्ट बाजार समिती सभापती यांच्या कडे फोन वरून दिली. आणि लगेच आज दि 03/10/21 रोज रविवारला कृ उ बा स वरोरा ची टीम दुपारी 2:00 च्या सुमारास येऊन आर्थिक मदतीचा धनादेश देऊन त्या कुटुंबातील पत्नी वर मुलाला धीर देत समोरही आम्ही प्रत्येक अडचणीत तुमच्या सोबत आहो असा धीराचा हात दिला.हि पहिली वेळ नसून आत्ता पर्यंत 100पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती कडून मदत करण्यात आली 

हे सर्व संचालक मंडळ मिळून काम करीत आहे, 

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री राजेंद्र चिकटे 

कृषी उत्पन्न बाजार समिती उप  सभापती देवानंद मोरे 

हरीश जाधव, संजय घागी, योगेश खामनकर, बंडू शेळकी, तसेच काही  कृषी उत्पन्न बाजार समिती    कर्मचारी  सचिव   

चंद्रसेन शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती उप सचिव सचिन डहाळकर आणि लिपिक श्रीकांत ताटेवार आणी गावातील पोलीस पाटील दिपक निब्रड, ग्राम प  सदस्य रोशन खोंडे   तसेच प्रहार शेतकरी संघटना माजी तालुका अध्यक्ष श्री   किशोर डुकरे, पत्रकार गोपाल निब्रड उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler