ब्रेकिंग..दिंदोडा येथे कोंबडबाजारावर धाड ११ आरोपी अटकेत....
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर
मो.न.8308264808
शेगांव (बु.) येथून जवळच असलेल्या पोलीस स्टेशन हद्दीतील दिंदोडा या गावात कोंबडाबाजार सुरु असल्याची गुप्त माहिती शेगांव पोलिसांना मिळाली असता ठाणेदार अविनाश मेश्राम याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टीमने रविवारी सकाळी ११ वाजता धाड टाकली असता कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणारे ११ आरोपी पकडण्यात शेगांव पोलिसांना यश आले तर काही आरोपी पळून गेले. यावेळी आरोपीकडून १६०० रुपये रोख रक्कम व मुद्देमाल व अनेक वाहनेही जप्त करण्यात आली. यामध्ये ५ कोंबडे, २ काती, ८ टू व्हीलर असा एकूण ४ लाख १२ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचारी.. श्री महादेव सरोदे (पीसआय), पोलिस कॉन्स्टेबल मदन येरने, देवानंद डुकरे, विठ्ठल पाटील, रमेश पाटील, इत्यादि कर्मचारी उपस्थित होते....