देऊळगावराजा येथील समर्थ कृषी महाविद्यालयाचे कृषी दूतांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत सावखेड तेजन येथील शेतकऱ्यांना शेततळ्यांचे महत्त्व पटवून दिले
महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक
ज्ञानेश्वर लाड
७७९८०७१८७६
देऊळगावराजा येथील समर्थ कृषी महाविद्यालयाचे कृषी दूतांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत सावखेड तेजन येथील शेतकऱ्यांना शेततळ्यांचे महत्त्व पटवून दिले तसेच शेततळ्याची होणारे फायदे उपयोग सांगून येथील एक शेततळ्यात भेट दिली पावसाच्या अनियमितपणा मुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो,अशा वेळी या तळ्यात साठवलेले पाणी पिकास देता येते.तसेच रब्बी हंगामाच्या सुरुवातीस जर शेततळ्यात पाणी साठवले असते तर त्या पाण्यावर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून मर्यादित क्षेत्रात एखादे पीक घेता येईल. शेततळ्यातील पाण्याची खोली 3.0 मीटर एवढी लांबी गृहीत धरून लांबी व रुंदी 15.15 मिटर 99 15 पॉइंट 15 मीटर 99 मिटर घेतल्या शेततळ्यात सुमारे 441000 लिटर पाणी त्यामुळे समजू शकते. यावेळी समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे रावे समन्वय प्रा. मोहजितसिंग राजपूत प्राचार्य सचिन सोळुंके सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच यावेळी सावखेड तेजन गावातील प्रगतशील शेतकरी विनोद लक्ष्मणराव विघ्ने तसेच कैलास नागरे वैभव बुधवत कृषिदूत अनिल माटे यांची उपस्थिती होती.