तालुका विधी सेवा समिती चिमुर अंतर्गत ग्राम पंचायत मोटेगांव येथे कायदेविषयक एकदिवसीय शिबिराचे आयोजन.

तालुका विधी सेवा समिती चिमुर अंतर्गत ग्राम पंचायत मोटेगांव येथे कायदेविषयक एकदिवसीय शिबिराचे आयोजन.

चिमुर तालुका ग्रामीण प्रतिनिधी

अनिल भोयर ९८२३५३४५५९



चिमुर तालुक्यातील मौजा  मोटेगांव येथे आज दिनांक १३/१०/२०२१ रोज बुधवारला ग्राम पंचायत मोटेगांव कार्यालयाचे पटांगणात चिमुर तालुका विधी सेवा समिती चिमुर अंतर्गत स्वातत्र्यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मोटेगांव येथील जनतेला हुंडा प्रतिबंध कायदा, कौटुंबिक हिंसाचार कायदा,बाल गुन्हेगारी,बाल विवाह प्रतिबंध कायदा,पर्यावरण संरक्षण कायदा इत्यादी कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचे अध्यक्ष म्हणून मोटेगांव येथील नवनियुक्त सरपंच श्री सुभाषजी नेवारे, उपाध्यक्ष म्हणून मोटेगांव येथील ऊपसरपंच श्री. चंदुजी रामटेके व सदस्य गणांची विशेष उपस्थिती होती.

   कार्यक्रमाची सुरुवात श्री संदीप चौधरी यांच्या प्रास्ताविक मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात प्रामुख्याने प्रमुख मार्गदर्शक म्हणून चिमुर येथिल न्यायालयात कार्यरत असलेले ॲड. शनैशचंद्र श्रिरामे यांनी कायदेविषयक सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे ॲड. आर .आर.सोनडवले, ॲड.आर.जी.रामटेके.व न्यायालयीन इतर कर्मचारी उपस्थित होते.त्याचप्रमाणे विधी महाविद्यालयाचे नवशिक्षित प्रशिक्षणार्थी सोनलचंद्र श्रिरामे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.या कार्यक्रमाकरीता मोटेगांव येथील बहुसंख्य जनतेनी शिबिराला उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.

       सदर शिबिराचे आयोजन हे सर्वोच्च न्यायालय व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन देशातील प्रत्येक गावात आयोजित करण्यात येत असून नागरिकांना कायदेविषयक जनजागृती व्हावी म्हणून कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे.सदर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विधी महाविद्यालयाचे नवशिक्षित प्रशिक्षणार्थी सोनलचंद्र श्रिरामे यांनी केले.व शिबिराची सांगता करण्यात आली..

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler