नवकीर्ती दुर्गा उत्सव मंडळ येथे 'सामुदायिक ध्यान' कार्यक्रमाचे आयोजन,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे
श्री गुरूदेव योग शिक्षण व सेवा समिति गडचिरोली व नवकिर्ति दुर्गा उत्सव मंडळ गड़ यांच्या वतीने आज सकाळी माँ दुर्गा देवीजवळ "सामुदायिक ध्यान" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. मंजिरी उल्हास बाटवे, दिवाकर पिपरे, ग्रामसेवाधिकारी बोदली, सौ. सुजाता पिपरे ग्रा. प. सदस्य बोदली, उपस्थित होते.
सर्वप्रथम माँ दुर्गादेवी च्या मूर्तीचे पूजन करून अधिष्ठानाला व राष्ट्रसंतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामुदायिक ध्यान पाठ घेण्यात आला.
त्यानंतर सौ. मंजिरी ताई बाटवे व दिवाकर पिपरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सुनील चड़गुलवार साहेब, दिलीप मेश्राम दादा, अनंता पांदिलवार, नामदेव इजनकर,प्रमोद मेडपलल्लीवार, बाबाराव नक्षिने, ज्ञानेश्वर बाबल, मनोहर कुद्रपवार, राजू ठाकूर, अंतरगाव, मनोजसिंह पवार, संदेश नक्षिने, अर्चना नक्षिने, यामिनी मेडपललीवार, सुजाता पिपरे, प्रिती मुक्तवरम, प्रांजली मुक्तवरम, अनिता ताई रामबोनीवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आयोजन प्रवीण मुक्तवरम ज़िल्हा प्रचारक गडचिरोली यांनी केले.
आरती प्रसाद घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.