आनंदनिकेतन महाविद्यालयात" महिलांचे आरोग्य व आहार "यावर जनजागृती कार्यक्रम
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा- आनंदनिकेतन महाविद्यालयातील महिला अध्ययन व सेवा केंद्र आणि लोकसंख्या शिक्षण मंडळ यांच्या वतीने सोमवार दिनांक 25 ऑक्टोबर 2021, रोजी जेष्ठ आहार तज्ञ आ.जयश्री पेंढारकर यांचे "महिलांचे आरोग्य व आहार" यावर आभासी पद्धतीने लेक्चर ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदनिकेतन महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रंजना लाड होत्या.
महिलांचे आरोग्य व आहार या विषयावर बोलताना पेंढारकर मॅडम यांनी एकंदरच आजची जीवनशैली,त्यासाठी आवश्यक असणारा योग्य आहार, आहाराची सप्तपदी यावर भाष्य केले. शिवाय कोणत्या वेळी कोणता आहार योग्य असतो यावरही मार्गदर्शन केले. आजचा तरुण हा देशाचे भविष्य आहे. आणि त्यासाठी तो सुदृढ असणे ही गरजेचे आहे,आणि म्हणून त्याचा आहार,त्याचे चारित्र्य चांगलेच असले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.शेवटी झालेल्या प्रश्नोत्तरातून अनेक विद्यार्थ्यांच्या आणि सहभागी झालेल्या प्राध्यापकांच्या शंकाचे निरसन जयश्री पेंढारकर यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत डॉ.रंजना लाड यांनी केले.ग्रामीण भागात आजही स्रियांच्या आहाराबाबत आणि आरोग्याबाबत उदासीनता आहे.या भाषणाच्या माध्यमातून आमच्या महाविद्यालयात असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचे योग्य प्रबोधन होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचे प्रास्ताविक,आ.पेंढारकर मॅडम यांचा परिचय व सूत्रसंचलन प्रा.मोक्षदा नाईक यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा.सरोज सहारे यांनी केले.आ.प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांचे मार्गदर्शन, प्रा.मनोहर चौधरी,प्रा.तिलक ढोबळे व आयोजन समिती यांच्या प्रयत्नांनी कार्यक्रम यशस्वी झाला