कल्याण-विशाखापट्टनम NH 61 या महामार्गावर प्राधिकरण खड्डय़ात मुरूम टाकून करु पाहतय मलमपट्टी.
पाथर्डी तालुका प्रतिनिधी
विकास खेडकर
पाथर्डी शहरातून जाणाऱ्या NH 61
महामार्गावर सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ात गेल्या 3 ते 4 वर्षापासून होणाऱ्या त्रासापासून वाचवण्याऐवजी महामार्ग प्राधिकरण
बघ्यांची भुमिका घेऊन काय साध्य करु पाहतय.
वारंवार आंदोलने करूनही प्राधिकरण सामान्यांच्या समस्या सोडवण्या ऐवजी
महामार्गावर रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ात मुरूम टाकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतय. या रस्त्यावर
घडलेल्या अपघातात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतय.
काही घरातील कर्त्या लोकांचा बळी गेलाय. मागील वर्षभरात दोनशे पार लोकांचा अपघात घडलाय.
येळी गावचे सामाजिक कार्यकर्ते सचिन पालवे यांनी महामार्ग प्राधिकरणाला काम लवकरात लवकर
पुर्ण होण्यासाठी निवेदन दिले.यावेळी
भाजपा तालुकाध्यक्ष मानिक खेडकर, भुतेटाकळी चे सरपंच सचिन फुंदे, उपसरपंच कल्याण फुंदे, शेकटे गावचे चे सरपंच मल्हारी घुले, सचिन बडे, श्रीराम फुंदे, राशिद भाई तांबोळी
आदी लोकांनी निवेदनावर सह्या केल्या.