ग्राम पंचायत मोटेगांव येथे संविधान सन्मान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रतिनिधी अनिल भोयर
चिमुर तालुका ग्रामीण प्रतिनिधी ९८२३५३४५५९
चिमुर तालुक्यातील मौजा मोटेगांव येथील ग्राम पंचायत कार्यालय येथे आज दिनांक २६/११/२०२१ रोज शुक्रवारला संविधान सन्मान दिनाच्या निमित्ताने "संविधान सन्मान दिन" मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला..
कार्यक्रमाची सुरुवात परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलीत करून व माल्यार्पण करून करण्यात आली.या कार्यक्रमाला मोटेगांव येथील प्रथम नागरिक सरपंच श्री सुभाषजी नेवारे, ऊपसरपंच श्री चंदुजी रामटेके , ग्रामसेविका वाघमारे मॅडम ,ग्राम पंचायत सदस्या वनिता घोडमारे ,ग्राम पंचायत कर्मचारी तेजराम ईंगुलकर व विनोद भोयर रविंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. संविधानाचे आपल्या जीवनातील महत्त्व यावर सरपंच श्री सुभाषजी नेवारे यांनी गावकरी बंधु भगिनींना मार्गदर्शन केले.
समारोपीय आभार प्रदर्शन वाघमारे मॅडम यांनी केले व भारतीय संविधान ऊद्देशपत्रिकेचे सामुदायिक वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.