नेरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिखली गावातील सांडपाण्याच्या समस्याकडे नेरी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

नेरी  ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिखली गावातील सांडपाण्याच्या समस्याकडे नेरी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

आमची समस्या दुर करा अन्यथा आम्ही आमच्या परिवारासह ग्रामपंचायत सामोरं आत्मदहन करु.


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे मो, 7038115037




नेरी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या चिखली गावातील दिलीप सोनवणे यांचा घराजवळील सांडपाण्याची समस्या सोडविण्यात नेरी ग्रामपंचायतीला अपयश आले असून सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकदा अर्ज विनंत्या करूनही या बाबीकडे संपूर्ण हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दिलीप सोनवाने यांनी केला आहे

          चिखली येथील कैलास  सोनवाने यांनी घराचे बांधकाम केले यात त्यांच्या संडास आणि न्हाणी घराचे पाणी हे खुलेआम गंगा वाहत आहे तो पाणी दिलीप सोनवणे यांचा घरासमोरून वाहत असल्याने त्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच गावातील नागरिकांना याचा खूप मोटा त्रास होत असून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे मागील चार महिन्यांपूर्वी पासून या बाबीची तक्रार अर्ज ग्रा प नेरीला दिला तेव्हा त्यांनी आरोग्य अधिकारी यांना पाठवले तसेच  उपसरपंच व सदस्य याना मौका चौकशी करून अहवाल सादर केला व लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी असे पत्र कैलास सोनवाने याना दिला परंतु अजुन पर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही त्यामुळे या पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सर्वत्र गंदगी निर्माण झाली आहे तेव्हा ग्रा प प्रशासनाने लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा अन्यथा ग्रा, प, समोर परीवारासहीत आत्मदहन करण्यात येईल असा इशारा दिलीप सोनवाणे यानी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler