पोलीस स्टेशन शेगाव.(बु.) तर्फे भव्य रक्तदान शिबिर....
वरोरा तालूका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो.न.8308264808
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३१ व्या पुण्यतिथी निमित्य भव्य रक्तदान शिबिर घेण्याचे आयोजन पोलीस स्टेशन शेगाव(बु) अधिकारी/कर्मचारी व पोलीस पाटील याच्या माध्यमातून घेण्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला उपस्थित उपविभागीय पोलीस अधीक्षक मिलिंद शिंदे तसेच सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली.या रक्तदान शिबिराला शेगाव परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद देऊन १७६ रक्तदात्यांनी रक्तदान केले...