डोंगरगाव रेल्वे येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी मोहस्तवाला ला सुरवात
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- वरोरा तालुक्यातील डोंगरगाव रेल्वे येथे दिनांक २४ नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर व.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी चा कार्यक्रम आयोजित केला. अनेक युवा प्रबोधनकाराचे कीर्तन गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केले. त्यात सकाळी ५ वाजता ध्यान प्रार्थना त्यानंतर 12 वाजता भजन त्यानंतर सायंकाळी 6 वाजता सामुदायिक प्रार्थना हरिपाठ आणि रात्रौ ला कीर्तन पहिल्या दिवशी युवा कीर्तनकार ह.भ.प. आशिष महाराज माणुसमारे दुसऱ्या दिवशी ह.भ.प आकाश महाराज तावीडे ग्रामगीता प्रचारक गुरुकुंज आश्रम मोजरी तर तिसऱ्या दिवशी युवा कीर्तनकार ह.भ.प प्रशांत महाराज ठाकरे यांचे कीर्तन झाले आज रात्रौ युवा प्रबोधन कार ह.भ.प स्वप्नील महाराज कुथे आणि त्याच्या संचाचा समाजप्रबोधन पर नाकलाच कार्यक्रम आयोजित केला या कीर्तन सोहळ्यानिमित्य गावात घरासमोर रांगोळ्या काढून सकाळी गाव स्वच्छ करून महाराजांना आदरांजली वाहण्यात आली