आवळगाव येथे रोगराईचे थैमान
ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि
मनोज अगळे 9765874115
जि.प.सदस्य डाॅ. राजेश कांबळे यांनी दखल घेत गावात लावला आरोग्य शिबीर
ब्रम्हपुरी तालुका मुख्यालयापासुन 30 कि.मी. अंतरावर जंगलव्याप्त भागात आवळगाव हे ५ हजार लोकसंख्येचे गाव आहे.
या गावात मागील १५ दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला, उलट्या व इतर रोगराईने अनेक नागरिकांना ग्रासले आहे. नागरिकांना वैद्यकीय उपचार घेण्यास विलंब होत होता.
सदरची बाब गावातील काही नागरिकांनी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे यांना सांगितली. तेव्हा राजेश कांबळे यांनी सदर बाब संवेदनशीलपणे घेत तत्परतेने जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना आवळगाव येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी सदर गावात आरोग्य शिबीर लावण्यासाठी सुचना दिल्या.
त्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने डाॅ. आदीत्य झलके व दिपाली शहारे सह चमु गावात दाखल झाली. 150 हुन अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार नागरिकांना मोफत औषधोपचार करण्यात आले.
नागरिकांनी सांगितलेल्या समस्येची गांभीर्याने दखल घेत जि.प. सदस्य डाॅ. राजेश कांबळे यांनी सदर गावात जाऊन नागरिकांची भेट घेत आरोग्य शिबीराला उपस्थिती दर्शवली. व नागरिकांना यावेळी आपल्या प्रकृतीची काळजी घेण्यासंदर्भात नागरिकांना सुचना दिल्या.
नागरिकांची तात्काळ समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिल्यामुळे गावातील नागरिकांनी जि.प.सदस्य डाॅ. राजेश कांबळे यांचे आभार मानले आहे.
यावेळी आवळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच भाष्कर बानबले, युवक कांग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश बानबले, प्रफुल वाडनकर ग्रा.पं. सदस्य यांसह अन्य गावकऱ्यांची उपस्थिती होती.