शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतल्या बद्दल प्रहार शेतकरी संघटणेचे किशोर डुकरे यांनी पेढे वाटून केला आनंद साजरा

शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतल्या बद्दल प्रहार शेतकरी संघटणेचे किशोर डुकरे यांनी पेढे वाटून केला आनंद साजरा

वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058




 शेतकरी विरोधी कायदे केंद्रसरकार ने संसदेत परित केले होते. याचा विरोध प्रत्येक राज्यातून शेतकरी करत होते तर पंजाब हरियाणा चे शेतकरी या कृषी कायद्याच्या विरोधात जवळपास आठ महिने दिल्ली च्या बॉर्डरवर आंदोलन करत होते हे कायदे रद्द करण्यात यावे या साठी देश भरातून शेतकऱ्याचे आंदोलन चालू होते. प्रहार शेतकरी संघटने चे वरोरा तालुका प्रमुख यांनी काही दिवसांपूर्वी टेमुर्ड्यात या काळ्या कृषी कायद्या विरोधात चक्काजाम आंदोलन केले 

    आज पंतप्रधानांणी हे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली याचा आनंद प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख  किशोर डुकरे यांनी पेढे वाटून शेतकऱ्यां सोबत आनंद साजरा केला

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler