आनंद निकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूंची गगन भरारी राष्ट्रीय चेस्टोबॉल स्पर्धेत कांस्य पदक
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
पेडपल्ली (तेलंगणा)येथे दिनांक 6 ते 8 नोव्हेंबर 2021 ला झालेली दुसऱ्या राष्ट्रीय फेडरेशन चेस्टोबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तिसऱ्या स्थानावर आपले नाव कोरले. या संघामध्ये आनंद निकेतन महाविद्यालयाच्या ऐकून सहा महिला खेळाडूंचा समावेश होता. त्या मध्ये संघाची कर्णधार म्हणून शीतल पाचभाई,वैष्णवी निखाडे, अंजली चौधरी, साक्षी खिरटकर,वैष्णवी दैवलकर,वैष्णवी दातारकर यांचा समावेश होता.
त्याचप्रमाणे वरिष्ट पुरुष संघाने सुद्धा स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली. त्या संघा मध्ये सुद्धा महाविद्यालयाचे ऐकून चार खेळाडू होते. त्यामध्ये चिराग भोयर,संकर खिरटकर,आयुष गोहणे आणि तेजस मडावी यांचा समावेश होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे ,उपप्राचार्य प्रा. राधा सवाणे,शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. तानाजी बायस्कर,श्री तुषार पारखी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.