तीन एकरातील धानाचे पुंजणे अज्ञात इसमाने जाळले
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधि
मनोज अगळे 9765874115
ब्रम्हपूरी तालुक्यातील मौजा गोगाव येथिल
कापणी झालेले धानपीक शेतात गोळा करीत पुंजणा करून ठेवण्यात आले होते. 3 एकरातील धानाचे पुंजणे अज्ञात इसमाने आग लावून जाळले असल्याची घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील गोगाव शेतशिवारात 12 नोव्हेंबर रोजी रात्री 7 वाजताच्या सुमारास घडली आहे.
गोगाव येथील रहिवासी असलेले प्रकाश रामचंद्र भोयर यांचे गावालगतच सायगाव रस्त्यावर शेती आहे. व त्यापासून काही अंतरावर दुसरे शेत आहे.
खरीप हंगामातील धानपीक कापणी करून त्याचे पुंजणे त्यांनी आपल्या शेतात करून ठेवले होते. तेव्हा विकृत मानसिकतेच्या अज्ञात इसमाने पुंजण्यांनी लवकर पेट घेतला पाहिजे म्हणुन त्यावर तणीस टाकुन आग लावली. एकाच इसमाच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शेतातील धान्याच्या पुंजण्याला आग लावणे हे वैयक्तिक आकसापोटी केलेले कृत्य आहे असे दिसून येत आहे.त्यामुळे सदर इसमाचा पोलीसांनी शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. अज्ञात ईसमा विरोधात भा. द. वी 435 अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढिल तपास मेडंकी पोलिस करित आहेत.