चिमूर एसटी डेपोचे कर्मचारी यांनी सरकारच सुतक पाडत डेपोच्या आवारातच काळी दिवाळी म्हणून केली साजरी.

चिमूर एसटी डेपोचे  कर्मचारी यांनी सरकारच सुतक पाडत डेपोच्या आवारातच काळी दिवाळी म्हणून केली साजरी. 

आमची लालपरी कधी चालू होनार जनसामान्य नागरीकांच्या मनात असलेला प्रश्न

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे मो, 7038115037

 


चिमूर:- दिवाळी सारखा सन हा सन प्रत्येक वर्षी प्रत्येक नागरीक आपल्या आपल्या घरी साजरा करत असतात मात्र या वर्षी तमाम महाराष्ट्रातील बरेच ठीकाणी एसटी महामंडळाच्या कर्मचारी यांनी अपघात झाला पगारातून कट,एक तीकीट नाही कापली घरी बसा रस्ते खराब मात्र गाडी नियमित वेळेवरच पोहचवा पगार मात्र कमी परिवार चालवायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला होता अश्या विविध त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्या आत्महतेचा आकाडा वाढतच चालला असुन याकडे महाराष्ट्र सरकारने चक्क दुर्लक्ष केले. या झोपल्याचे सोंग घेतलेल्या निष्क्रिय सरकारला जागे करन्यासाठी एसटी कामगार यांनी गेल्या 30 तारखेच्या मध्यरात्री पासुन बेमुदत संप पुकारत सरकार च सुतुक म्हणून एसटी डेपोच्याच आवारात आपल्या परिवारासह पेंढाल टाकुन बसले आहेत. सलग आजचा सहावा दिवस असुन वर्षातील सर्वात मोठा सन म्हणून ओळख असणारी दिपावली हा सन एसटी कामगार यांनी सरकारचे सुतुक पाडत काडी दिवाळी म्हणून चिमूर डेपोच्याच आवारात आपल्या परिवारासह साजरी केली. 

हा बेमुदत संप कधी ऊठनार हे अद्याप कळले नसुन प्रवाश्यांचे बेहाल होत आहे. आपला भारत देश हा क्रुषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आनी या देशातील महाराष्ट्र राज्य ही संताची भुमी म्हणून ओळख आहे. या संतांच्या राज्यात गोर गरीब शेतकरी शेतमजूर विधवा महीला आंधळे लंगळे असे अनेक अपंग यांची शासनाने दिलेल्या मुभेनुसार यांना कमी तिकीट दर असलेली लालपरी एसटी बस सेवा ही गेल्या सहा दिवसापासून बंद असल्यामुळे नाईलाजास्तव त्यांना घरीच रहाव लागत आहे. हे महाराष्ट्रचे दुर्दैव आहे. पुढे लालपरी रस्त्याने नेमकी कधी धावेल याकडे जनसामान्य नागरीकांच लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler