ब्रेकिंग:- शेतकऱ्यांवर वाघाने केला जीवघेणा हल्ला शेतकरी थोडक्यात बचावले
वनविभाग वाघाला जेल बंद करतील का आणखी शेतकऱ्याचे जीव घेण्याची वाट पाहतील शेतकऱ्यांनि केला सवाल
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- वाघ विहिरीत पडल्याची बातमी ताजी असताना पुन्हा एकदा वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढवला शेतकरी थोडक्यात बचावला शेतकरी संतप्त एक तर वाघाला जेलबंद करा किव्हा आम्हाला वाघ मारायची परवानगी द्या असा वनविभागाला इशारा
भटाला या गावातील शेतकरी नामदेव कटू गराडे वय ७० वर्ष हे आपल्या शेतात कापूस वेचत असताना अचानक वाघाने हल्ला चढविला व शेतकऱ्याला जखमी केले सदर वाघाने हल्ला चढविताच शेतकऱ्याने आवाज केला मला वाचवा...मला वाचवा असा आवाज करताच रस्त्याने जात असलेले शेतकरी प्रभाकर मगरे, माणिक जांभूळे, मैनाबाई जांभुळे धावून गेले आणि वाघाला हाकलून लावले त्या शेतकऱ्याला तात्काळ दवाखान्यात रवाना केले. वाघामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लवकर त्या वाघाला जेरबंद करा अन्यथा आम्हाला वाघाला मारायची परवानगी द्या असा सवाल गावकरी वनविभागाला करत आहे.