महालक्ष्मी कंन्स्ट्रक्शन कंपनीने स्थानीकांच्या संयमाचा अंत पाहु नये - मनसे नेता मनदिप रोडे

महालक्ष्मी कंन्स्ट्रक्शन कंपनीने स्थानीकांच्या संयमाचा अंत पाहु नये - मनसे नेता मनदिप रोडे

प्रदुषण,रस्ते,धुळ,विविध आजार सहन करुनही स्थानीकांना रोजगार देण्यास कंपनीचे दुर्लक्ष

वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058


चंद्रपूर - एकोणा कोळसा खाणीमुळे या क्षेत्रातील मार्डा,एकोना या गावात प्रदुषण,रस्त्याची दुर्दशा, नाकातोंडात जाणारी धुळ, धुळीने माखलेली पिके, पिकांचे नुकसान, धुळीमुळे होणारे गंभीर आजार अशा संपूर्ण जीवन उध्वस्त करणारी परिस्थीती निर्माण झाली आहे. अशा भयंकर स्थितीचा संकटाचा सामना करणार्या स्थानीकांना एकोणा खाणीत कार्यरत महालक्ष्मी कंन्स्ट्रक्शन कंपनी रोजगार देण्यास दुर्लक्ष करीत आहे.याबाबत आतापर्यंत मनसे नेता मनदिप रोडे यांच्या सोबत स्थानीकांना एसडीओ,तहसीलदार,वेकोली कुचना माजरी, वेकोली जीएम यांना देखील निवेदन दिले आहे. मात्र आतापर्यंत याकडे दुर्लक्ष करीत महालक्ष्मी कंपनीसह एसडीओ,तहसीलदार,ठाणेदार देखील स्थानीकांची थट्टा करने सुरु केले आहे. स्थानीकांनी न्यायासाठी मनसेकडे धाव घेतली आहे.स्थानीकांच्या संतापाचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो येत्या काळात मनसे स्थानीकांसह कंपनी विरोधात खळखट्याक आंदोलन करणार आहे. याची जाणीव ठेवून महालक्ष्मी कंपनीने स्थानीकांच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशारा मनसे नेता मनदिप रोडे यांनी दिला आहे.

एकोना कोळसा खाणीतील महालक्ष्मी कंन्स्ट्रक्शन कंपनीमुळे या भागात मोठ्या प्रमाणात प्रदुषण निर्माण होत आहे. या प्रदुषणाचा त्रास स्थानीक जनता सहन करीत आहे. कंपनीचे अवजड वाहने गावातील रस्त्यातून जात असल्याने रस्ते पूर्णपणे फुटले आहे. रस्त्यात मोठमोठाले खड्डे पडले आहे. या रस्त्यातील खड्ड्याने येथील लोकांचे अपघात होत आहे. कुणाचे पाय तर कुणाचे हात तुटत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात धुळ निर्माण होत आहे. लोकांच्या नाकातोंडात घराघरात धुळ जात आहे.शेतीतील पिके धुळीने माखत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे.सोबतच धुळीने विविध गंभीर आजार येथील लोकांना होत आहे. एकंदरीत या कंपनीमुळे येथील लोकांचे जीवन उध्वस्त झाले आहे. इतके सहन करुनही कंपनी येथील स्थानीकांना कामावर घेत नाही. एकीकडे सगळच उध्वस्त करायचे व जगण्यासाठी रोजीरोटी देखील द्यायची नाही असा विश्वासघात महालक्ष्मी कंपनी स्थानीकासोबत करीत आहे. कंपनीच्या या धोरणामुळे स्थानीकांमध्ये संताप निर्माण झाला असून स्थानीकांनी आपली व्यथा मनसे नेते मनदिप रोडे यांच्या पुढे मांडली. यामुळे स्थानीकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे नेते मनदिप रोडे यांनी यापूर्वी महालक्ष्मी कंपनी तसेच एसडीओ,तहसीलदारांना निवेदन देऊन शांततापूर्ण व लोकशाही पद्धतीने प्रयत्न केले आहे. मात्र महालक्ष्मी कंपनीसह एसडीओ,तहसीलदार,ठाणेदार देखील स्थानीकांना रोजगार देण्याकडे दुर्लक्ष करुन स्थानीकांची थट्टा करने सुरु केले आहे. यामुळे संतप्त स्थानीकांच्या संतापाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो. याची जाणीव कंपनीसह शासकीय अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. रोजगाराच्या प्रश्नावर महालक्ष्मी कंपनीने स्थानीकांच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशारा मनसे नेते मनदिप रोडे यांनी दिला आहे. आमची जमिन,साधन संपत्ती घेऊनही जर आम्हाला जगण्यासाठी रोजगार मिळत नसेल तर आम्हाला अशा कंपन्या नकोय अशी भुमिका स्थानीकांनी घेतली आहे. येत्या काळात स्थानीकांचे आंदोलन कुठल्या स्तरापर्यंत जाईल याची कल्पना करने कठीण आहे. अशी भावना स्थानीक व्यक्त करीत आहे. या वेळेस प्रशांत झुंजारे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे,गौरव मेले तालुका अध्यक्ष मनविसे, स्वाभी राऊत विभाग अध्यक्ष महिला सेना,विभाग अध्यक्ष राकेश हनुमंते,संदीप अराडे,आकाश काकडे, व स्थानिक बेरोजगार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler