"मिशन वात्सल्य" योजनाची बैठक सन्मानीय तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न व सखोल चर्चा....

"मिशन वात्सल्य" योजनाची बैठक सन्मानीय तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न व सखोल चर्चा....


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भुतकर मो.न.8308264808

दिनांक २०/१२/२०२१  रोज सोमवरला "मिशन वात्सल्य " योजनेची बैठक पार पडली

मागील दोन वर्षापासून कोविड-१९ च्या महामारीत वरोरा तालुक्यातील एकाच कुटुंबातील आई व वडील अशा दोन्ही पालकाचे निधन झाल्याने ० ते १८ वयोगटातील तथा एकल/विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ शासन निर्णयान्वये अनाथ बालकांना न्याय व हक्क मिळण्यासाठी कुटुंबांना प्रत्यक्ष भेट व त्यांच्या पुनर्वसन शासनामार्फत "मिशन वात्सल्य" शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित त्यामध्ये.शाळेतील विद्यार्थ्यांची फी माफ करणे,कुटुंब निवृत्तीवेतन योजना,शिधापत्रिका,वारसा प्रमाणपत्र, LIC व इतर विमा लाभ बाबत, बँक खाते,आधार कार्ड,जातीचे प्रमाणपत्र, निराधार योजना, श्रावण बाळ योजना, घरकुल,कौशल्य विकास, अंत्योदय योजना, इत्यादी योजनेचा लाभ उपलब्ध करून देणेबाबत मिशन वात्सल्य  योजना संबंधित बैठक पार पडली व त्यामध्ये सन्माननीय तहसीलदार मॅडम श्रीमती रोशनी मकवाने अध्यक्ष म्हणून यांनी मार्गदर्शन केले तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी वरोरा सदस्य श्री मरसकोले साहेब,तथा समितीचे इतर सदस्य डॉ.मंजनकर तालुका वैद्यकीय अधिकारी,पोलीस उपनिरीक्षक चौरे साहेब, नायब तहसीलदार श्री काळे साहेब, गट व शिक्षण अधिकारी कुंचनकर साहेब, उपस्थित होते.सदर सभेला सर्व लाभार्थ्यांचे विचार जाणून घेऊन लाभार्थ्यांना लाभ उपलब्ध करून देण्याची रूपरेषा तथा नियोजनाने आखणी केली......

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler