राष्ट्रीय "महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार" परमानंद तिराणिक यांना जाहीर

राष्ट्रीय "महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार" परमानंद तिराणिक यांना जाहीर 

वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058


 इमेज इंटरनँशनल आँनलाईन रिसर्च सेंटर, कला , साहित्य व सामाजिक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट तर्फे दरवर्षी शिक्षकांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर पुरस्कार दिला जातो. चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन येथील आनंद अंध विद्यालयाचे कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांना २०२१ चा मानाचा "महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार" जाहीर झाला आहे.

      परमानंद तिराणिक हे उत्कृष्ट सुलेखनकार कला शिक्षक असुन, ते त्यांच्या ज्ञानाचा कल्पकतेचा वापर करून अध्यापनात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून समाजजागृती करतात. "वारली चित्रकला" ही केवळ भिंतीवरच चितारण्याच्या कला नसुन त्याचा आशय विद्यार्थ्यांना समजावून आदिवासींची जगण्याची जीवनशैली त्यात रेखाटली गेली आहे हे शैक्षणिक अभ्यासक्रमातून दाखवता आले पाहिजे म्हणून त्यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना त्यांनी अनेकदा आपल्या पत्रसंवादातून व्यथा विशद केली आहे.

      त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील वैविध्यपूर्ण व उच्च योगदानामुळे यापुर्वीच "युथ आयकाँन अवार्ड" साठीही त्यांचे नामांकन झाले होते. हे विशेष त्यांचा मानाचा गौरवच म्हणावा लागेल. समाजात असाधारण प्रतिमा निर्माण करणाऱ्या रत्नविरांचा अतुलनीय सन्मान सोहळा, कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज स्मारक सभागृहात झी मराठी या वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील अण्णा नाईक यांची भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते मा. माधव अभ्यंकर यांच्या हस्ते त्यांना "महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात येणार आहे..

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler