संकल्प करिअर पॉईंट जालना व सुशिम कॅम्पुटर इन्स्टिट्यूट देवमुर्ती यांच्या संयुक्त विद्ययमाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन व खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 संकल्प करिअर पॉईंट जालना व सुशिम कॅम्पुटर इन्स्टिट्यूट देवमुर्ती यांच्या संयुक्त विद्ययमाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन व खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 प्रविण हिवाळे जालना तालुका प्रतिनिधी - 9156204245


दि.२६/१२/२०२१ वार रविवार रोजी सावंगी (तलान) ता. जि. जालना येथे १६०० मीटर धावणे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेमध्ये २५०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदणी केली होती. परंतु ओमेक्रोन प्रादूरभाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे, व शासनाच्या नियमांचे पालन करून ८७४ स्पर्धकांनी सक्रिय सहभाग घेतला.या स्पर्धेमध्ये विजेता खेळाडू-१.साईनाथ एकनाथ मोरे,औरंगाबाद या स्पर्धकांनी प्रथम पारितोषिक ( *७००१* ₹ )मिळवून सन्मान चिन्ह मिळविले आहे. २.सतीश रमेश गायकवाड,ता.भोकरदन,जि.जालना या स्पर्धकांनी द्वितीय पारितोषिक ( *४००१* ₹ ) मिळवून सन्मान चिन्ह मिळविले ३.अमोल सुधाकर तळेकर,ता.देऊळगाव राजा,जि.बुलढाणा,या स्पर्धकांनी तृतीय पारितोषिक ( *३००१ ₹* ) मिळवून सन्मानचिन्ह मिळविले. ४.अनिल शिवाजी दुर्गुले,रा.तुपेवाडी,जि.जालना या स्पर्धकांनी चौथे पारितोषिक मिळविले .तसेच ५.अविनाश भिमराव आचलखांब,रा.मानेगाव,ता.जि. जालना,हा संकल्प करिअर पॉईंटचा विद्यार्थी याने पाचवे पारितोषिक मिळवून सन्मान चिन्ह मिळविले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.आ.अरविंद चव्हाण,मा.रमेश यज्ञेकर(जोशी),युवराज राठोड,मुकेश चव्हाण,उमेश मोहिते,संतोषराव डोंगरखोस,पद्माकर हंडे,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा गाडेकर यांनी केले आहे. व आभारप्रदर्शन नितेश लक्ष्मण रंधवे यांनी केले आहे.संकल्प करिअर पॉईंटचे संचालक संदीप रंधवे,उपसंचालक सुनील राजकर,सहसंचालक अनिल राजकर,संस्थापक अध्यक्ष नितेश रंधवे,यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य सौ.सविता विठ्ठल खराडे(सरपंच) सौ.कमलाबाई सोपान मांदळे (उपसरपंच),मा.कमलाकर कळकुंबे,प्रभाकर रंधवे,शामराव कळकुंबे,यादवराव खराडे,प्रभाकर डिखुळे,उमेश पवार,बोलसुरे सर,उस्तुर्गे सर,गंगाधर रंधवे,विठ्ठल सिंग बायस,राजू रंधवे,अंकुश उगले,परमेश्वर रंधवे,संजय मेंढरे, राजेभाऊ कळकुंबे,विनायक राठोड,कृष्णा गाडेकर,विशाल रंधवे,राहुल कळकुंबे,कैलास रंधवे,तुकाराम राठोड,रमेश मुळे,सखाराम मुळे,कचरू खराडे,किशोर खराडे,पांडुरंग आहेरकर,सुरेश रंधवे,किशोर झोरे,गजानन हरकळ,बाळू हरकळ,संजय रंधवे,सुनील आहेरकर,अनिल राठोड,राजू डोंगरे,संदीप गाडेकर,अशोक भंडारे,विलास कळकुंबे,योगेश खराडे,अमोल रंधवे,बाळू रंधवे,अतिश रंधवे,सुरज रंधवे,सुखदेव रंधवे,कारभारी रंधवे,आकाश रंधवे,विकास रंधवे,विलास रंधवे,बालू रंधवे,अनिल रंधवे,बाबासाहेब रंधवे,गौतम रंधवे,सचिन रंधवे,नितीन रंधवे,प्रशांत रंधवे,सुधाकर रंधवे,संतोष रंधवे,विजय रंधवे,प्रदीप हरकळ,कृष्ण कळकुंबे,रवी आहेरकर,विशाल भंडारे,सुनील शेजुळ,आकाश राठोड,निखिल राठोड,कृष्णा राठोड आदी युवकांचे व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.हा कार्यक्रम वेळेत व व्यवस्थित पार पडला.सर्व युवकांनी व सावंगी (तलान) येथील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल,संकल्प करिअर पॉइंट जालना व सुशिम कंप्यूटर इन्स्टिट्यूट,देवमुर्ती यांच्या वतीने केंद्र चालक नितेश रंधवे यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler