शेगावला पान्याच्या समस्येतून मुक्त करू.........
ग्रामपंचाय सरपंच सिद्धार्थ पाटील.
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो.न.8308264808
शेगाव बु हे गाव ९ हजार लोकसंख्या असलेलं बाजारपेठेचे गाव आहे.दर उन्हाळ्यात गावाला पाणी टंचाईला खूप सामोरे जावे लागते याकरिता ग्रामपंचायत कडून दोन विहिरींची निर्मिती करून पाणी टंचाई दूर करण्याच्या कार्यास सुरुवात झाली.१५व्या वित्त आयोगातून स्मशानभूमी येथे अंदाजे ९ लाखाच्या विहिरीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सध्या शेगाव येथे धानोली स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व चारगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मधून पाणी येत आहे.जर विहिरीचे पाणी शेगावात आल्यास चारगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद करून तेथील ग्रामपंचायत वर पडणारा अतिरिक्त भार कमी होईल अशी प्रतिक्रिया सरपंच सिद्धार्थ पाटील यांनी दिली.या विहिरीचे उद्घाटन ग्रामपंचायत मधील पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी वामेश्वर मैस्कर व वसंता गौरकर यांनी केले तर सरपंच सिद्धार्थ पाटील, यशवंत लोंढे,शंकर घोडमारे, सागर कामडी, माया तडस,मनीषा घोडमारे,जोत्सना फुलकर,माया आत्राम,महेश घोडमारे व गावकरी उपस्थित होते....