प्रहार अपंग क्रांती संस्था देऊळगाव राजा तालुका शाखे व्दारा जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न
देऊळगाव राजा तालुका
प्रतिनिधी संदीप म्हस्के
दिनांक 03/12/2021, रोजी स्थानिक नगर परिषद सभागृह देऊळगाव राजा येथे प्रहार अपंग क्रांती संस्था तालुका कार्यकारिणी व्दारा जागतिक दिव्यांग दिनानिमित्त एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात होते या कार्यशाळेसाठी उद्घाटक म्हणून नगर परिषद मुख्याधिकारी श्री अरूण मोकळ कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून प्रा श्याम मुंडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमंत निकाळजे तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये राजेंद्र वानखेडे शारीक खान सर अँड प्रदिप घेवंदे काशिफ कोटकर उपस्थित होते या कार्यशाळेमध्ये मुख्य मार्गदर्शक प्रा श्रीमंत निकाळजे यांनी दिव्यांग दिनाच्या इतिहास पार्श्वभूमी व दिव्यांगाच्या विविध योजनांची माहिती दिली उद्घाटक अरून मोकळ यांनी दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या व दिव्यांगाना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच प्रमुख पाहुणे अँड प्रदिप घेवंदे यांनी दिव्यांचा साठी असलेले कायदे व तरतुदी या विषयी सविस्तर माहिती दिली व राजेंद्र वानखेडे सहायक प्रकल्प अधिकारी न प दे राजा यांनी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या दिव्यांग विषयक योजनांची व बजेट विषयी माहिती दिली व मुख्याध्यापक शारिक खान यांनी दिव्यांगता हि शारीरिक नसून मानसिक असते असे प्रतिपादित केले कार्यशाळेचे अध्यक्ष श्याम मुंडे यांनी दिव्यांग विषयक सामाजिक दृष्टिकोण अपंगांचे प्रकार व त्यांच्यासाठी असणारे उपक्रम व कार्यक्रम या दिवशी सविस्तर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश साळवे व आभार प्रदर्शन अतिश खरात यांनी केले भाई आकाश कासारे यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप म्हस्के तालुका अध्यक्ष अन्वर खान तालुका सचिव दत्तु इजाळे तालुका उपाध्यक्ष यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच पवन पिंपळे आकाश कासारे शेख मुस्तफा शेख असलम शेख इरशाद शहेबाज शाह संतोष कराळे शेख बोंद्रोदीन,जावेद खान अब्दुल रज्जाक शेख गौस अनिल कांबळे व शेख कदिर पत्रकार उपस्थित होते