प्रा. श्रीकांत पुरी यांना आचार्य पदवी प्रदान

प्रा. श्रीकांत पुरी यांना आचार्य पदवी प्रदान

वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058


वरोरा येथील स्थानिक लोकमान्य महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख, प्रा. श्रीकांत पुरी यांना स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड तर्फे आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. श्रीकांत पुरी मागील आठ वर्षापासून पदवी व पदव्युत्तर वर्गाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रा. श्रीकांत पुरी यांनी 'English Language Acquisition of the Tribal Learners at Secondary Higher Secondary and Undergraduate Levels in Chandrapur District' या विषयावर आपले संशोधन कार्य डॉ. दयानंद माने (इंग्रजी विभाग प्रमुख, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शंकरनगर, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.  दिनांक 02/12/2021 रोजी त्यांची मौखिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठा कडून घेण्यात आली. या मौखिक परीक्षेला मार्गदर्शक डॉ. दयानंद माने, बाह्य परीक्षक म्हणून डॉ. अर्चना भट्टाचार्यजी (असोसिएट प्रोफेसर, जोरहट कॉलेज, जोरहट, आसाम), डॉ. पंचशील एकअंबेकर (अधिष्ठाता, सामाजिकशास्त्र, स्वा. रा. ति. विद्यापीठात, नांदेड) आणि संबंधित विषयात रस असणारे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. श्रीकांत पुरी यांच्या यशाबद्दल लोक शिक्षण संस्था, वरोडा चे अध्यक्ष प्रा. श्रीकांतजी पाटील आणि संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, लोकमान्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुबोध कुमार सिंह आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद तसेच त्‍यांच्‍या मित्रपरिवाराने अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler