वाहतुकीचे नियमासबंधीत नागरिकांमध्ये खडसंगी येथे निघाली जनजागृती रॅली
चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर पोलीस स्टेशन चा अनोखा उपक्रम. ठाणेदार मनोज गभणे यांचा पुढाकार.
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे
आज दिनांक 13/12/2021 रोजी सकाळी 12/00 वा. पोलीस स्टेशन चिमुरच्या वतीने जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, खडसंगी येथील विद्यार्थी/विद्यार्थींनी यांचे सहकार्यातुन बाजार चौक येथे वाहतुकीचे नियमांसबंधाने नागरीकांमध्ये जनजागृती करण्याकरीता रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीमधील एकुण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरीकांकरीता जोर जोराने घोषवाक्ये दिली.
दिवसेंदिवस वाढ होत असलेल्या रस्ते अपघातांवर प्रतिबंध व्हावा व अपघातातील मृत्युचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने पोलीस निरीक्षक मनोज गभने पो.स्टे. चिमुर यांचे संकल्पनेतुन शाळकरी मुलांच्या माध्यमातुन रॅलीचे आयोजन करण्यात आले असुन सदर रॅलीकरीता जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक सौ. पुष्पा मस्की श्री. विलास बांबोळे सौ. देवीन्द्रा पाटील त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन चिमुरचे पोलीस निरीक्षक श्री. मनोज गभने, पोलीस हवालदार डोनू मोहूर्ले, पोलीस नाईक कैलास आलाम, पोलीस अंमलदार मनोज ठाकरे, महिला अंमलदार महानन्दा आंधळे, मयुरी कोराम तसेच वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार सुखराज यादव, रामेश्वर डोईफोडे व खडसंगी येथील पोलीस पाटीलसह गावातील नागरीक यांनी उपक्रमात सहभाग घेतला.