वीरशैव लिंगायत जनजागृती अभियान अंतर्गत समाजकार्य करण्याचा निर्धार

वीरशैव लिंगायत जनजागृती अभियान अंतर्गत समाजकार्य करण्याचा निर्धार

  

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी

बाबुराव देशमुख 9325330034


  वसमत-- श्री गुरु पादे श्वर शिवाचार्य मठ संस्थान गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली या मठाचे मठाधिपती सद्गुरु गुरुपादेश्वर  शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज व गुरुवर्य वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत यांच्या आशीर्वादाने वसमत तालुक्यांमध्ये वीरशैव लींगायात जनजागृती अभियान चालू आहे या अभियानामध्ये सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य साठी जागृतीच्या माध्यमातून निधीचे संकलन केले जात आहे दररोज एक रुपया अशा पद्धतीने वर्षाचे 365 रुपये आसा  निधी संकलित होत आहे जमा झालेला निधी समाजातील गोरगरीब सर्वसामान्य यांच्या शैक्षणिक कार्यासाठी किंवा आरोग्याच्या कार्यासाठी वापरला जाणार आहे .युवा संत गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज हे वसमत तालुक्यांमध्ये गावोगावी जाऊन जागृती करत आहेत आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना आधार देण्याचे काम करीत आहेत. गुरुवर्य यांचा आदर्श घेऊन वसमत तालुक्यातील डोनवाडा गावातील समाज बांधवांनी आज गिरगाव येथे जाऊन गुरुवर्य यांचे आशीर्वाद घेऊन जमा झालेला निधी अभियानाच्या अकाउंट मध्ये वर्ग केला आहे आणि तेथे आज डोनवाडा गावातील रमेश देशमुख, शिवदास देशमुख गजानन दगडू देशमुख, गजानन ग्यानबानोबा देशमुख, श्रिपत  देशमुख, बाबुराव देशमुख इत्यादी समाजबांधव उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler