पोलीस स्टेशन शेगाव बु येथे पोलीस पाटील यांची मासिक बैठक संपन्न.....

पोलीस स्टेशन शेगाव बु येथे पोलीस पाटील यांची मासिक बैठक संपन्न.....


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भूतकर मो.न.8308264808



आज दिनांक १०/०२/२०२२ रोज गुरवारला पोलिस पाटील यांची मासिक बैठक घेण्यात आली. या बैठकीला शेगाव बु पोलीस स्टेशन हद्दीतील ३९ पोलिस पाटील उपस्तिथ होते.उपस्तिथ पोलीस पाटील यांना गावातील दारू,जुगार अवैध  धंद्यानबाबद आणि गावात येणारे मुसाफिर,जादूटोणा, बुवाबाजी बाबत माहिती घेऊन पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच १९/०२/२०२२ ला येणाऱ्या शिवजयंती आणि येणारे सण उत्सव कोरोना नियमांचे पालन करून साजरे करण्यात यावे अशे मार्गदर्शन करण्यात आले.तसेच गावातील कायदा व सुव्यवस्था संदर्भात समस्या,अडी-अडचणी या बाबत चर्चा करण्यात आली.नेहमी प्रमाणे पोलिस पाटील यांच्या कामाला प्रोत्साहन म्हणून माहे जानेवारी २०२२ मध्ये उत्कृष्ट काम केल्या बद्दल चारगाव बु येथील पोलिस पाटील राजेन्द्र शामराव थुल यांना सन्मानपत्र आणि शिल्ड देऊन त्यांचा सत्कार करण्यार आला.तसेच प्रोत्साहन म्हणून सुमठाणा येथील पोलीस पाटील सौ.महाकाळकर मॅडम यांचा सुद्धा ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी सन्मानपत्र आणि शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler