देऊळगाव राजा शहरातील सर्व रेशन दुकानदारांची चौकशी करून कारवाई करा प्रकाश बस्सी यांची मागणी.

 देऊळगाव राजा शहरातील सर्व रेशन

दुकानदारांची चौकशी करून कारवाई

करा प्रकाश बस्सी यांची मागणी





देऊळगाव राजा.कीरन वाघ

रेशन दुकानांमध्ये ग्राहकांना देण्यात येणाऱ्या

कोणत्याही सुविधा उपलब्ध नसून जसे,

स्वस्त धान्य दुकानांमध्ये दुकानाची वेळ,

सुट्टीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही

उपलब्ध असल्याची नोंद, रेशन कार्यालयाचा

पत्ता व फोन नंबर, रेशन कार्ड संख्या, भाव

व देय प्रमाणात उपलब्ध असलेला कोटा

ही माहिती असणे अनिवार्य असते. तसेच

स्वस्त धान्य दुकानामध्ये बीपीएल, अंत्योदय

व अन्नपूर्णा लाभार्थ्यांची यादी लावणे

बंधनकारक असते परंतु तेथे कोणतीही

यादी लावण्यात येत नसून तसेच ग्राहकांना

देण्यात येणाऱ्या सोई सुविधा माहीत होत

नाही. ज्या दुकानांमध्ये शासनाने ठरवून

दिलेल्या माहिती फलक नसेल अशा

दुकांनावर कठोर कारवाई करण्यात यावी ही

मागणी प्रकाश बस्सी यांनी देऊळगाव राजा

तहसीलदार यांना एका पत्र द्वारे मागणी

करण्यात आली


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler