रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्याना निधी मंजूर करुनदेणे बाबत.
देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
वरील विषयास अनुसरुन सन 2021-22 दरम्यान देऊळगांवराजा शहरातील आसपास 70 ते 75 लाभार्थ्याना घरकुलाचा निधी उपलब्ध होऊन वाटप करण्यात आला. परंतू उर्वरीत शेकडो लाभार्थी घरकूलाची मंजुरात होऊनही निधी अभावी त्यांना लाभ मिळविता आला नाही. लाभा पासून वंचित राहिलेले लाभार्थी निधी अभावी पक्के घरे बांधुन राहण्यासाठी सक्षम झाले नाही.
तरी आपण आपल्या कार्यालयामार्फत शासन दरबारी पाठपुरावा करुन वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करुन द्यावा व वितरीत करुन त्यांना सक्षम करावे. करिता सविनय सादर. आतिष खरात राजू पाटोळे सुनील अभय दिहाते आतिश पाटोळे