आनंद निकेतन महाविद्यालयात ऍड ऑन कोर्स संपन्न

आनंद निकेतन महाविद्यालयात ऍड ऑन कोर्स संपन्न


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058

     

             

   वरोरा:- महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे अर्थशास्त्र विभागातर्फे ऑनलाईन ऍड ऑन  कोर्स "अर्थशास्त्रातील अंदाजपत्रक "या विषयावर  दिनांक 27 जानेवारी 2022 ते 10 फेब्रुवारी 2022 या कालावधीत राबविण्यात आला.          

                    या कोर्स चे उद्घाटक  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे हे होते. दिनांक 27 जानेवारी 2022 ला झालेल्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी  केंद्रीय अर्थसंकल्प व त्याचे अर्थशास्त्रातील महत्त्व या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक मान्यवर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले.रोज जवळपास  दोन तास विषय तज्ञांनी आपल्या विषय मांडला.

    प्रा.अपर्णा कुलकर्णी,सेंट झेवियर्स कॉलेज ,मुंबई यांचे बजेटरी सिस्टीम, 

प्रा.सचिन गेडेकर यांचे कॅपिटल बजेट प्रा.डॉ. नरेंद्र पाटील यांचे जेंडर बजेट ,    प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे,भामरागड यांचे सेल्स बजेट , प्रा. सौ माया डकाहा यांचे फॅमिली बजेट, प्रा. प्रणय दाते यांचे झिरो बजेट ,प्रा.सौ. मनीषा बारसागडे  यांचे पर्सनल बजेट, प्रा.सागर मांडवकर यांचे गव्हर्मेंट बजेट ,प्रा. संदीप ताजणे यांचे इन्व्हेस्टमेंट बजेट , प्रा. सौ अपर्णा कुलकर्णी,मुंबई  यांचे सेंट्रल बजेट, प्रा.सौ. सोनाली बडे -कदम,पुणे  यांचे प्रोजेक्ट बजेट, प्रा. मनोहर चौधरी यांचे मार्केटिंग बजेट, प्रा. मंगेश मेश्राम यांचे एक्‍सपेंडिचर बजेट अशा विविध  विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या कोर्स वर आधारित चाळीस मार्कांची परीक्षा ही घेण्यात आली व प्रमाणपत्र  वितरित करण्यात आले.या कोर्समध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.

                या कोर्सच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे  यांनी अर्थशास्त्र व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार कोर्सचे कॉर्डिनेटर व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ नरेंद्र पाटील यांनी मानले.याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राचा आपल्या जीवनात प्रत्यक्षपणे कसा फायदा करून घेता येईल याबद्दल मार्गदर्शन केले व शुभेच्छा  दिल्या. हा कोर्स संपन्न होण्याकरिता प्रा. मोक्षदा नाईक, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी, यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler