चिमूर येथे तालुका शेतकरी सल्लागार समिती सभा संपन्न

चिमूर येथे तालुका शेतकरी सल्लागार समिती सभा संपन्न


प्रतिनिधी -प्रवीन वाघे



तालुका कृषि अधिकारी कार्यालय, चिमुर येथे कृषि विभाग (आत्मा) अंतर्गत तालुका स्तरीय तालुका शेतकरी सल्लागार समितीची  दिनांक १४ फेब्रुवारी ला श्री. दिलीप नलोडे समिती अध्यक्ष यांचा अध्यक्षते खाली सभा आयोजित करण्यात आले होती.

             सदर सभेला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाचे मा.कृषि उपसंचालक, चंद्रपुर श्री. रविन्द्र मनोहरे साहेब, श्री.डी.ए.तिखे तालुका कृषि अधिकारी, चिमुर, सौ. लताताई पिसे सभापती पंचायत समिती, चिमुर, श्रीमती रेखाताई कारेकार उपसभापती जिल्हा परिषद चंद्रपुर श्री मनोज मामीडवार, जिल्हा परिषद सदस्य, व तालुका शेतकरी सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते. सदर चा सभूत मा. कृषि उपसंचालक, चंद्रपुर श्री रविन्द्र मनोहरे साहेब यांनी तालुका शेतकरी सल्लागार समितीची कार्यपध्दती चे मार्गदर्शन करून कृषि विभागाचे योजना चे सवीस्तर मार्गदर्शन केले.प्रत्येक योजना शेतकऱ्यांना कश्या फायदेशीर आहेत आणि त्यासाठी काय करावे लागते  याबद्दल योग्य मार्गदर्शन केले यानंतर अधिकारी वर्ग आणि मान्यवरांनी या सभेला संबोधित केले आणि शेतकरी वर्गाला माहिती दिली यानंतर सभेची सांगता झाली  श्री.आर.एन. कन्नाके तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, चिमुर यांनी उपस्थित सदस्याचे व मान्यवरांचे आभार प्रदर्शन केले. 

तसेच तालुक्यातील कृषि विभागा मार्फत सुरू असलेल्या योजनाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात भेट दिली यात  श्री श्रीकांत मारगोनवार रा.शेडेगाव यांचे शेतावरी महाज्योती अंतर्गत करडई तेलबिया लागवड, शेडनेड मध्ये काकडी लागवड, व श्री. महादेव नन्नावरे रा. मिनझरी यांचे रा.ए.डी. योजना अंतर्गत गोडावुन बांधकाम ची पाहणी करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler