नेरी येथील बँक ऑफ इंडिया विविध समस्याच्या विळख्यात

नेरी येथील बँक ऑफ इंडिया विविध समस्याच्या विळख्यात

ग्राहकाच्या समश्या मार्गी लावाव्या अन्यथा  प्रहार स्टाईलने आंदोलन करू प्रहार सेवक प्रविण वाघे याचे तहसील दारांना निवेदन

जिल्हा  प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058



चिमूर तालुक्यातील नेरी हे सर्वात मोठे गाव असुन नेरी येथे बँक ऑफ इंडियाची एकच राष्ट्रियकृत शाखा असुन या बँकेला हजारोच्या संख्येने खातेदार आहेत.परंतु ही शाखा समस्यांच्या विळख्यात सापडली आहे  ग्राहक दैनंदिन व्यवहार करतांना या बँकेत मोठी गर्दी उसळत असते. यामध्ये रांगेत ग्राहक प्रवेश करतात ग्राहकांना ऊन पावसात तासनं तास बाहेर उभे राहावे लागतात. सदर शाखेमध्ये पार्किंग ची व्यवस्था नसल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. व खातेधारकांना बसण्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तसेच संडास- बाथरुमची व्यवस्था नाही यामुळे आजपर्यंत कित्येक खातेधारक उभे राहु- राहु चक्कर येवून आजारी पडले आहेत. त्याचप्रमाणे शाखेमध्ये दोन महिण्यापासुन विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी दिलेले अजुन पर्यंत खाते मिळालेले नाही त्यामुळे विद्यार्थी स्कॉलरशिप पासुन वंचीत राहणार आहेत.  वारंवर सांगतात की अकाऊंट ओपनिंग ची लिंक सद्या बंद आहे . या बँकेला जोडलेल्या विविध गावातील खातेधारकाकडुन अशा समस्येचे तक्रार प्रहार संघटनेकडे आलेली होती  

             या तक्रारीच्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाने विविध समस्या मार्गी लावण्यासाठी दि 14 फेब्रुवारी ला तहसीलदार चिमुर, ग्रामपंचायत नेरी, शाखा व्यवस्थापक नेरी यांना निवेदन सादर केले  आणि येत्या ७ दिवसाच्या आत खालील समस्या मार्गी लावाव्यात.अशी मागणी करून प्रमूख समस्या सादर केल्या विद्यार्थ्यांचे बँक खाते त्वरीत उघडण्यात यावे. (दोन महिण्यापासुन खाते उघडणे बंद आहे.) शाखेमध्ये ग्राहकांसाठी संडास बाथरुमची व्यवस्था करावी. खातेदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. खाते ग्राहकांना वरुन छताची व टेबल बसण्याची व्यवस्था करण्यात यावी.  खाते धारकांना वाहन पार्किंग उपलब्ध करुन देण्यात यावी.  बँकमध्ये कॅश काऊंटर महिला व पुरुष यांचे वेगवेगळे ठेवण्यात यावे. बँक पासबुकच्या ट्रॅक्झाक्शनच्या एंट्र्या वेळोवेळी नियमित करुण देण्यात याव्या.  बँक ऑफ इंडिया शाखा नेरी येथील बंद पडलेले एटिएम मशिन त्वरीत सुरळीत चालु करण्यात यावी. खातेधारकांना पाहिजे तेवढया रक्कमेचे विद्राल न देता फक्त ५,०००/- रु.पर्यंतच विड्राल देत असतात. ती मर्यादा वाढविण्यात यावी. अश्या विविध प्रकारच्या समस्या   सात दिवसाच्या आत पुर्ण न झाल्यास बँक आॅफ इंडिया शाखा नेरी चे समोर प्रहार स्टाईल ने आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.सदर निवेदन हे राज्य मंत्री बच्चु कडु यांच्या मार्गदर्शनाखाली शेरखान पठाण यांच्या नेत्रुत्वात प्रहार सेवक प्रवीण वाघे, हरजीत सींग भौड, संजय वाघे, रवी चुटे,अंकुश नन्नावरे, आषीश कामडी,अमोल गीरडे, प्रवीण बोरसरे, शंकर दंडारे,अरविंद वाघाडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler