लोकमान्य महाविद्यालय वरोरा राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर करंजी येथे संपन्न
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गणेश उराडे 8928860058
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष शिबिर दिनांक २० मार्च ते २६ मार्च या कालावधीत माैजा करंजी या गावात घेण्यात आले.या विशेष शिबिराचे उद्घाटन २० मार्च ला रोज रविवारला मा.प्रा.श्रीकांत पाटील (अध्यक्ष, लोकशिक्षण संस्था,वराेडा) यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह मा. श्रीकृष्णाजी घड्याळपाटील, सौ.सुवर्णरेखाताई पाटील (सदस्या, महाविद्यालय विकास समिती,लोकमान्य महाविद्यालय, वरोरा) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुबोध कुमार सिंग,सरपंच सौ सविता काळे,उपसरपंच मा. श्री सुजित कष्टी आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.हे विशेष शिबिर "स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष- मतदार जनजागृती आणि ग्रामीण उन्नतीकरिता युवाशक्ती शिबिर" या संकल्पनेवर आधारित होते.
या विशेष शिबिरात ७५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.या ७५ विद्यार्थ्यांमार्फत करंजी गावातील सांडपाण्याच्या व्यवस्थेच्या दृष्टीने १४०० फूट लांबीच्या नालीचे खोदकाम श्रमसंस्काराच्या माध्यमातून करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बौध्दिक सत्रात तज्ञ मार्गदर्शकांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.त्यात मा. सौ. सुवर्णरेखाताई पाटील, मा. श्री. विश्वनाथ जोशी, सौ.वंदना बर्डे इत्यादींचे मार्गदर्शन लाभले.या बौद्धिक सत्रात २३ मार्च २०२२ रोजी रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात ८४ रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधाचे वाटप करण्यात आले.यात वरोरा येथील डॉ. कपिल टोंगे (जनरल फिजिशियन), डॉ.विशाल हिवरकर( बालरोग तज्ञ), डॉ. आशुतोष झाडे (दंतरोग तज्ञ )यांची सेवा लाभली.
यासोबतच या विशेष शिबिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.त्यात करंजी गावातील भजनी मंडळीचा भजनाचा कार्यक्रम ,राष्ट्रीय सेवा योजनेच्या कलापथकाचा सांस्कृतिक कार्यक्रम,शिवछत्रपती कला मंडळ, दहेगाव यांच्या समाजप्रबोधनात्मक नकलांचा कार्यक्रम इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या सात दिवसीय विशेष शिबिराच्या समारोप कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २६ मार्च २०२२ रोज शनिवारला करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुबोध कुमार सिंह होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.सौ. प्रतिभाताई धानोरकर, लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. श्रीकांत पाटील,कार्यवाह मा.श्री श्रीकृष्णाजी घड्याळपाटील, मा.सौ. सुवर्णरेखाताई पाटील, सरपंच सौ सविता काळे आदी उपस्थित होते.प्रमुख उपस्थिती असलेल्या मा. सौ. प्रतिभाताई धानोरकर(वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार) यांनी आपल्या भाषणातून "राष्ट्रीय सेवा योजना हे समाजसेवेचे माध्यम आहे" असे मत मांडले.तर मा. प्रा. श्रीकांत पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थी संस्काराचे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे असे मत मांडले.तर प्राचार्य डॉ. सुबोध कुमार सिंग यांनी या विशेष शिबिराच्या आयोजनाची भूमिका मांडली.या उद्घाटन व समारोप कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी डॉ. रवींद्र शेंडे, या उद्घाटन व समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. तानाजी माने ,उद्घाटन कार्यक्रमाचे आभार प्रा. उत्तम देऊळकर तर समारोप कार्यक्रमाचे आभार डॉ. श्रीकांत पुरी यांनी मानले.या विशेष शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.
