रेल्वेमंत्री दानवे च्या विरोधात आंदोलन.

 रेल्वेमंत्री दानवेंच्या विरोधात आंदोलन


संतप्त नाभिक समाजाने जोडे मारून केला निषेध व्यक्त





बुलढाणा. संपादक .राजेंद्र डोईफोडे.देऊळगाव राजा: आघाडी सरकारवर टीका करताना केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध असलेले यांनी नाभिक समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य  करीत नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या मुळे सोमवारी बसस्टँड चौकात नाभिक समाजाच्या व सकल बाराबलुतेदार संघटनेच्या वतीने जोडे मारून त्यांच्या राजीनाम्याच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला दानवे नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा समता परिषद जिल्हा अध्यक्ष संतोष खांडेभराड यांनी दिला तहसील कार्यालय समोर तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले राज्य सरकारवर टीका करताना मंत्री दानवे यांची जीभ घसरली हे सरकार म्हणजे तिरुपती येथील अर्धवट काम करणारे नाभिक असून असे अपमानजनक वक्तव्य दानवे यांनी केले या विधानामुळे तिरुपती येथे समाज बांधवासहित देशभरातील समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत दनवेंनी जाहीर माफी मागावी अशी मागणी सकल नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी नाभिक संघटनेचे तालुका तालुका अध्यक्ष सुनील शेजुळकर, अर्पित मीनासे, अरविंद खांडेभराड, सुरेश शेळके, नवनाथ गोमधरे,अमोल बोबडे,संदीप राऊत ,अमोल राऊत, सतीश सोनवणे,गजानन बोबडे, राजेश पंडित, संदेश वाघ, कैलास जाधव, परमेश्वर गुडघे, धनंजय मोहिते, हरिओम मोहिते, शिवशंकर शिवरकर, रवी  मोहिते, रमेश मोहिते, गणेश हिवाळे, रवी जाधव, जगदीश वाखारे, शंकर बोरकर ,विठ्ठल निंबाळकर, वैभव पंडित ,गणेश सोनवणे, गजानन निंबाळकर कैलास जाधव संतोष पंडित ,गणेश निंबाळकर ,सुधाकर वरपे ,सचिन मोहिते ,गजानन बोबडे, योगेश बोबडे ,कृष्णा वखरे, सुनील हिवरकर ,कैलास मोहिते ,पांडुरंग बोरकर, दीपक वैद्य ,राहूल सोनूसे, यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler