दादापुर येथे शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना व खेळाच्या साहित्याचे उदघाट्न .....
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो.न.8308264808
स्थानिक शेगाव बु येथून जवळच असलेल्या दादापुर या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. प्राथमिक शाळेचं योग्य व्यवस्थापन व्हावं आणी विध्यार्थ्यांना व शाळेला भेडसावत असलेल्या समस्याच लोकसहभागातून योग्य निराकरण करता यावं यासाठी सदर समिती गठीत करण्यात आली यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून श्री. सतीश क कुंभारे यांची नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून दिलीप बोधाने यांची निवड करण्यात आली तर शिक्षक तज्ञ म्हणून कु.अमोल मो नन्नावरे तसेच याच बरोबर लोकसहभागातून मा.श्री भाऊराव लंडांगें यांचे कडून मेरिगो राउंड व स्लाईड तर ओमप्रकाश नन्नावरे व दिपक ठेंगणे यांच्या कडून स्विंग (झुला) भेट देण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.प्रवीण निमजे,सहायक शिक्षक मा.श्री. प्रवीण हजारे,पंचायत समिती सदस्य विजय आत्राम,सौ. वंदना डोंगरे,संगीता नन्नावरे,दिपक लंडांगें,सौ.कांता जांभुळकर, सौ.कविता नन्नावरे,सौ.जोत्स्ना दोडके, सौ. अहिल्या वाकडे, श्रीमती. सुमन लंडांगें,सचिन कोटकर,कु.गायत्री कोटकर वि.प्रतिनिधी,कु.आयुष कंडे वि.प्रतिनिधी याचबरोबर विध्यार्थी आणी समस्त गावकरी उपस्थित होते......