देऊलगावराजा येथील जालना बायपास वर भीषण अपघात
पाच जनाचा जागीच मृत्यु
बुलढाणा जिल्हा संपादक राजेंद्र डोईफोडे
देऊलगावराजा शहरातील बाय पास रोड हे सतत अपघात ग्रस्त बनले आहे,
या बायपासवर नेहमीच अपघात होताना दिसून येते जसे काही बायपास हे मृत्यू चे माहेरघर आहे असे वाटायला लागले,
देऊलगावराजा शहरातून जालना कडे जाणारा रस्ता व जालना येथून देऊलगावराजा शहरात व शहरा बाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी केलेला बायपास या ठिकाणी कोणतेही वळण सर्कल नाही व बायपास वळण मार्ग दर्शविणारा फलक हा खूप समोर असल्यामुळे वाहन चालकांना योग्य दिशा कळत नाही व त्यातच कोणत्याही बायपासवर गतिरोधक नाहीत त्यामुळे देऊलगावराजा येथील तिन्ही बायपास वर अपघाताची संख्या वाढत आहे,
त्यातच आज सकाळी पाच ते सहा च्या दरम्याने जालना कडून येणारी बोलोरो व जालना कडे जाणाऱ्या ट्रक चा हॉटेल विजय समोरील बायपास वर समोरा समोर जोरदार धडक होऊन बोरोलो मधील जालना जिल्ह्यातील रोहिनगड येथील बारा जना पैकी पाच जणांचा जास्त मार लागल्या कारणाने जागीच मृत्यू झाला तर बाकीचे हे गँभीर जखमी झाल्याने त्यांना जालना येथिल सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे,
अपघाताची माहिती मिळताच देऊलगावराजा येथील ठाणेदार व पोलीस कर्मचारी यांनी अपघात ठिकाणी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले,
तसेच डी वाय एस पी साहेब व त्याचे कर्मचारी तसेच
महामार्ग पोलीस मदत केंद्र मलकापूर यांच्या टीम ने सुद्धा तात्काळ धाव घेऊन अपघात स्थळाची पाहणी केली,
या अपघाताने देऊलगावराजा शहरात हळहळ व्यक्त होत आहे