प्रीयकराच्या मदतीने पत्नीने टू-व्हीलर सह नदीत फेकुन नवर्याचा काढला काटा

प्रीयकराच्या मदतीने  पत्नीने टू-व्हीलर सह नदीत फेकुन नवर्याचा काढला काटा 

या घटनेमुळे जील्यात ऊडाली एकच खळबळ

तासात बल्लारपूर पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा

प्रतिनिधि -प्रवीण वाघे


         10 मार्च रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान राजुरा येथुन बल्लारपूर कडे येताना एक व्यक्ती दुचाकीसह नदीत पडल्याचे व एक व्यक्ती पुलावर पडल्याची घटना घडली होती.दुसऱ्या दिवशी मृतकाचा शोध पोलिसांनी घेतला असता प्रेत सापडले नाही परंतु दुचाकी नदीपात्रातून हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले.या घटनेचा तपास बल्लारपूर पोलिसांनी सुरू केला असता पण बल्लारपूर पोलिसांनी  हा अपघात नसून हत्या असल्याचे तपासाअंती उघड केले असुन अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

       प्राप्त माहितीनुसार मृतक रामेश्वर उर्फ लाल्या कलीचरण निषाद (30) रा.डॉ.आंबेडकर नगर बल्लारपूर आणि आरोपी सुरज हुबलस सोनारकर शेजारी राहत होते. मृतक रामेश्वरच्या पत्नी सोबत आरोपी सुरज चे अनैतिक प्रेम संबंध जुळले.दोघांच्या प्रेमात पती अडसर ठरला होता. त्याचा काटा काढन्याचा कट मागील दोन महिन्या अगोदर रचला होता. पण त्यास अंतिम रूप देण्याची संधी शोधत होते. 

     अखेर 10 मार्च रोजी आरोपी सुरज आणि त्याचा मित्र  अभिजित दिनेश पांडे रा, करणवाडी-मारेगाव, जिल्हा यवतमाळ मृतक रामेश्वरला सोबत घेऊन तिघेही राजुरा इथे राजु  धाब्यावर जेवण करण्यासाठी गेले. तिथे जाण्यापूर्वी तिघांनीही मद्यप्राशन केले. धाब्यावर जेवण करून परत येताना वर्धा नदीच्या पुलाजवळ आरोपींनी लघुशंकेसाठी दुचाकी थांबविली व रस्त्यांवर रहदारी नसल्याची संधी हेरून त्यांनी रामेश्वर निषाद ह्याला पुलावरून नदीत ढकलून दिले व पुरावा मिळू नये ह्यासाठी दुचाकीही नदीत फेकली.

     मुख्य आरोपी सुरज मात्र पुलावर पडुन राहिला. घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना  कळताच पोलिसांनी रामेश्वरचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान नदीपात्रात दुचाकी आढळून आली मात्र रामेश्वरचा मृतदेह सापडला नव्हता. ह्या घडामोडीत पोलिसांना हत्येचा संशय येत असल्याने व मिळणाऱ्या माहितीमध्ये विसंगतपणा  असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत  आपल्या पद्धतीने तपास सुरू केला असता हा अपघात नसुन अनैतिक संबंधातून केलेली हत्या असल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराने बल्लारपुर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler