सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगाव राजा यांच्या हलगर्जीपणामुळे फुलाचे व रस्त्याचे कामला उशीर.

 सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगाव राजा यांच्या हलगर्जीपणामुळे फुलाचे व रस्त्याचे कामला उशीर.





बुलढाणा संपादक राजेंद्र डोईफोडे

काही दिवसापासून रोडचे काम चालू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हे काम पूर्ण होण्यास उशीर होत आहे. तरी या निवेदनात माननीय श्री बंडू राजे उत्तम डोळस शहर अध्यक्ष मनसे देऊळगाव राजा. व सत्यनारायण पालवे. सामाजिक कार्यकर्ते यांनी बांधकाम विभाग यांना यापूर्वी रीतसर निवेदन देऊन काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे असा इशारा मनसे स्टाईल मध्ये देण्यात आला होता. या कामाची दखल घेऊन तातडीने काम पूर्ण करण्यात यावे अशी सक्त ताकीद देण्यात आली होती.

तरीपण सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्या दुर्लक्षामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या च्या जीवावर बेतत आहे. या  निवेदनाद्वारे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम यांना ताकीद देण्यात आली आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करा नाहीतर मनसे स्टाईल ने आंदोलन करू. निवेदन देताना दत्ता जावळे मनसे जिल्हा उपाध्यक्ष. (परिवहन) विजय भागिले मनसे तालुकाध्यक्ष. सोमनाथ शिंदे तालुका उपाध्यक्ष. देवा डीगोळे तालुका उपाध्यक्ष. नवनाथ रामाने शहर उपाध्यक्ष. शरद खरात तालुका सरचिटणीस .अशोक खरात शहर सचिव. तसेच प्रमोद शिंदे .योगेश शिंदे .अंकुश गव्हाळे. सतीश निलख. कैलास शिंदे. देवा चव्हाण. रामदास सावंत. गोपीनाथ गायकवाड. रोहिदास सावंत. सुधीर पाटोळे .अमर सावंत .सोमनाथ सावंत. तसेच इतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार मुन्ना ठाकूर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler