गोधंनखेड येथील विकासकामांची माहिती मिळण्यासाठी आमरण उपोषण, दुसऱ्या दिवशीही अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ.
आनंदा गोविंदा काकड उपोषणाला बसलेले
बुलढाणा जिल्हा संपादक राजेंद्र डोईफोडे. देऊळगाव राजा:- तालुक्यांतील गोंधनखेड ग्रामपंचायत मध्ये झालेल्या विकास कामाची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकाचे विरोधात देऊळगाव राजा पंचायत समिती समोर आनंदा काकड यांनी आमरण उपोषण सुरू केले असुन दुसरा दिवस संपला तरीही अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाकडे पाठ फिरवल्याने रोष व्यक्त होत आहे,
आनंदा काकड यांनी माहिती अधिकार 2005 नुसार शासकीय जन माहीती अधिकारी सचिव ग्रामपंचायत कार्यालय गोधनखेड यांना सर्व साक्षाकीत प्रती मिळण्यासाठी पंचायत समिती येथे दि. 20/01/22 रोजी लेखी अर्ज सादर केला होता परंतु सदर अर्जावर सर्व प्रथम माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर विलंबाने दि.23/02/22 रोजी माझ्या अर्जात नमूद नसलेली माहीती देण्यात आली ती माहीती मी माझ्या अर्जात मागतली नव्ह्ती
मागणी केलेल्या अर्जानुसार माहीती मिळावी या बाबतीत जन माहिती अधिकारी यांचेकडे विनंती केली असता माहीती देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे जर माहिती दिली नाहीतर केवळ शासनाचा दंड भरून मोकळ होता येईल असा उद्देश ग्रामसेवक तथा जन माहिती अधिकारी यांचा दिसुन येत आहेत
अर्जात नमूद नसलेली माहीती देऊन दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली.
तरी जन माहीती अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय गोधनखेड यानी मला अर्जानुसार मी मागितलेली संपूर्ण माहीती दि.1 मार्च 2022 पर्यंत प्रत्यक्ष द्यावी .
अन्यथा मी ग्रामसेवक यांचेविरूध कायदेशीर रित्या माहीती मिळण्यासाठी
दिनांक 03/03/2022 वार गुरुवार रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आनंदा गोविंदा काकड यांनी दिला होता. दिलेल्या मुदतीपर्यंत न्याय न मिळाल्याने अखेर आनंदा काकड यांनी गुरूवार पासून पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उपोषण मंडपापर्यंत आले व माहिती मिळण्यासाठी वेळ लागतो तुम्हाला उपोषण करता येत नाही असे बोलले, व सोबत आणलेल्या कागदपत्रांवर सही मागितली मात्र आनंदा काकड यांनी सही करण्यास नकार दिला व मागणीवर ठाम राहिले परिणामी विस्तार अधिकारी निघून गेले, ग्रामीण भागात राहणारी व्यक्ती न्याय्य हक्कांसाठी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारते आणि पंचायत समितीचे अधिकारी त्याची दखल घेत नाही हि शोकांतिका असुन ही बाब लोकशाही प्रणालिमध्ये पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची प्रतिक्रिया आनंदा काकड यांनी दिली आहे यावेळी उपोषण मंडपात प्रल्हाद काकड निलेश गिते, रहिम पठाण, आदी नागरीक उपस्थित होते.