राष्ट्रीय मार्ग लगत असलेल्या कवडसी (देश) येथील रस्ता बनला जीवघेणा,,,

राष्ट्रीय मार्ग लगत असलेल्या कवडसी (देश) येथील रस्ता बनला जीवघेणा,,,

जिल्ह्या परिषद बांधकाम उपविभागाला दिले निवेदन

चिमुर:- प्रवीण वाघे


   चिमुर तहसील मुख्यालय पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय मार्ग क्रमांक 233 लगत कवडसी देश येथील मुख्य मार्गावरुन जाणाऱ्या रासत्याची दयनीय अवस्था झाली असून, नागरिकांना त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे, या बाबत जिल्ह्या परिषद बांधकाम उपविभागाला निवेदन देण्यात आले

           चिमुर तालुक्यातील कवडसी देश हे गाँव काँपा शंकरपुर रोड वर असून पाचगाव फात्यावरुन उत्तरेस दीड किलोमीटर अंतरावर आहे, गावात एण्याजान्या करीता एकच रस्ता असून रासत्याला जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले आहेत, गावातील नागरिकांना व शाळेतिल विधार्थयाना पूर्ण रस्ता खराब झाल्यामुळे खुप त्रास सहन करावा लागत आहे, या संदर्भात मागील 3 वर्षों पासून वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊन सुधा प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे येत्या 15 दिवसात तात्काळ दुरुस्ती किवा नुतनिकर्न नाही केल्यास कवडसी येथील समस्त नागरीक शंकरपुर काँपा रोड़ वर चक्का जाम आंदोलन करतील असा इशारा गावकर्यांच्या वतीने राजकुमार माथूरकर यानी जिल्ह्या परिषद बांधकाम उपविभागीय कार्यालय चिमुरला निवेदनातून दिला आहे, यावेळी ग्राम पंचायत सदस्य सावन गाडगे, जेष्ठ नागरिक नत्थुजी वैरागड़े, प्रीतम वंजारी, रोहित थेरे, ममता वंजारी काजल पांगुळ, तन्मय वंजारी, योगेश्वर वंजारी उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler