*बालाजी नगरी देऊळगाव राजा येथे सेवानिवृत्ती सैनिक सत्कार सोहळा व मिरवणूक*
दत्ता हांडे तालुका प्रतिनिधी देऊळगाव राजा
भारतीय सैन्यदलात आर्टिलरी रेजिमेंटचे सैनिक वसंता अंबादास जायभाये सव्वीस वर्षे सेवा करून मायदेशी सुखरूप निवृत्त झाल्याबद्दल बालाजी नगर व देऊळगाव राजा पंचक्रोशीतील माजी सैनिक मित्रांनी प्यारा मिलिटरी सैनिक मित्रांनी डोल ताशाच्या गजरात बस स्थानक चौकात फटाके फोडून सैनिक स्वागत रॅलीची सुरुवात केली.
आयोजक सैनिक बंधू माजी सैनिक रामेश्वर अंबादास जायभाये माधव मुंडे सैनिक मित्र भिमराव चाटे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या ंच मार्गावरील अश्वारूढ पुतळ्यास सैनिकाने हारार्पण केले छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय भारत माता की जय घोषणा दिल्या व सत्काराचा कारवा पुढे चालला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सैनिक वसंत जायभाये व सैनिक पत्नी यशोदा ताई माधव मुंडे यांनी हार घातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय जवान जय किसान वंदे मातरम नारे देत सावकास सैनिक सन्मान रॅली पुढे चालली दोन्ही तर्फा गाड्यांची गर्दी असताना दुसऱ्या बाजूच्या गाडीतील प्रवाशांनी सैनिक रॅलीचा आनंद आनंद घेत अभिवादनाचा प्रतिक्रिया दिल्या बुलढाणा अर्बन चिखली अर्बन कर्मचारी शिक्षक वर्ग पत्रकार मुशीरभाई कोटकर सदानंद डोईफोडे भारतीय माजी सैनिक संघटना संजय जायभाये सरपंच हनवतखेड शहा स्टील चे मालक हरून शहा अशपाक शहा अनिस शहा यांनी स्वागत केले सुजल एक्वा चे शाम गुजर साहेबांची सजवलेल्या गाडीत दिमाखात मिरवणूक निघाली राष्ट्र संत प्लाझा पुढे रामेश्वर मेडिकल जायभाय सर भाजपाचे महामंत्री डॉक्टर गणेश दादा मांटे यांनी सैनिका सह सैनिक पिता अंबादास जायभाये यांचे स्वागत केले तसेच समर्थ हॉस्पिटलचे डॉक्टर पवन डोईफोडे अभय जाधव सर पुंगळे सर पद्मा सावजी निलेश अग्रवाल सैनिक विष्णु सानप खळेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र डोईफोडे गणेश डोईफोडे यांनी स्वागत केले जवळपास 50 महिलांनी सैनिकांचे आरती ओवाळून औक्षण केले व शाल श्रीफळ व हारांनी सेवानिवृत्त सैनिक सद्गदित झाले या कार्यक्रमात सैनिक मित्र केशव नागरे भगवानराव बोंद्रे रामभाऊ सोनुने गजानन नागरे सरपंच सोनक्षी संतोष मुंडे रवी आघाव बद्री उगलमुगले गणेश जायभाये गणेश इलग बंडू मुंडे अर्जुन मुंडे बाळू जायभाये कृष्णा सानप सतीश उगलमुगले श्याम खराडे राम खराडे केशव मुंडे बद्री वनवे व सैनिक मित्र भिमराव चाटे यांनी स्वागत केले माजी सैनिक रामेश्वर जायभाये व सेवानिवृत्त सैनिक वसंत जायभाये यांनी सर्वांचे आभार मानले व असा सोहळा आमच्या लग्नात सुद्धा झाला नाही आज देश सेवा केल्याचा अभिमान वाटतोय सैन्यात भरती झालो तेव्हा घर ची हालत फार बिकट होती आज पर्यंत आयुष्याचा गाभा तारुण्य देशासाठी दिले आता पुढील जीवन घर परिवार आणि समाजासाठी देऊन मायभूमीचे उतराई होऊ असे सैनिक म्हणाले कन्याकुमारी पासून ते जम्मू काश्मिर पर्यंत गुजरात पासून ते आसामपर्यंत देशभरात वारा पाऊस ऊन सहन करत दुर्गम स्थानात ड्युटी केली त्याचे आज सार्थक झाले आलेल्या सर्व पाहुण्यांचे सैनिक मित्रांचे भोजन झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.