तब्बल 32 वर्षांनंतर बालपणीच्या वर्ग मित्राच्या आठवणींना उजाळा

 


तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे

 देऊळगाव राजा येथील नगर परिषद श्री शिवाजी हायस्कूल मध्ये लहानपणापासून   अनिल हांडे  इयत्ता 10 वी पर्यन्त शिक्षण घेत असताना,

वर्ग मित्र म्हणून मित्रांमध्ये बऱ्याच काही कडू गोड आठवणी अंतर्मनात साठविलेल्या असतात, सन 1991 ते 92 दरम्यान हे सर्व एकाच विद्यार्थी शिकत असतांना परीक्षा झाल्यानंतर आपापल्या भावी जीवनातील उचित धेय्य साध्य करण्यासाठी तिथे मैत्रीला थोडं अंतर द्यावं लागतं

परंतु या 10 च्या बॅच मधील काही मित्रांना आपल्या वर्ग मित्राची आठवण सतत येत होती,

याचाच एक प्रयोग म्हणून 

सुनील शेजुळ, प्रविणकुमार काकडे यांनी व्हाट्सएपच्या ग्रुपच्या माध्यमातून अथक परिश्रमाने सर्वाचे नंबर घेऊन सर्वाना एकत्र आणण्याचे केले,

आणि औरंगाबाद वाळूज येथील बालपणीचे मित्र पण आताचे मोठे उद्योजक सचिनजी गिरनिवाले साहुजी यांनी उदार मनाने आज रोजी गेट टू गेदर तसेच स्नेह मिलन व भोजनाचा न भूतो न भविष्यती असा आपल्या लहानपणीच्या मित्रासाठी आगळा वेगळा कार्यक्रम ठेवला,

प्रथम तहा सर्व मित्राचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले,

त्यानंतर सर्वानी थोडक्यात आपापले मनोगत व आतापर्यंत च्या जीवन प्रवासा वरील हितगुज व्यक्त केले,

तर प्रविणकुमार काकडे यांनी

अहेसांन तुम्हारा है, मेरे दोसतो,,

ये दिल तुम्हारे प्यार का है,मारा दोसतो,,,

या गाण्यातून  व एका कवितेतून सर्वांची प्रशंसा केली

स्वादिस्ट भोजनाचा आनंद घेतल्या नंतर जातांना सर्व मित्राना सचिन साहुजी यांनी भेट म्हणून रवी म्हसाले यांची एक एक किट दिली

व सर्वानी सुख, दुःखात अशीच साथ द्यावी ही अपेक्षा व्यक्त केली,

या 32 वर्षात या मित्र परिवारात कोणी डॉक्टर , वकील, पत्रकार, शिक्षक, पोलीस, नगरसेवक, सामाजिक सेवक तर कोणी उद्योगपती झालेले बाल मित्र बघायला मिळाले

या प्रसंगी देऊलगावराजा वरून जवळपास 40 मित्र परिवार उपस्थित झाले होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler