शेगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळा सम्पन्न....
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो.न.8308264808
वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं सुयोग्य व्यवस्थापन व्हावं आणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळावी व त्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव बु येथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य कार्यशाळेचे आयोजन केंद्रप्रमुख मा. श्री. अंनत आखाडे यांनी केले होते या कार्यशाळेला सुलभक म्हणून मा.श्री.संजय जांभुळे शिक्षक,मा.श्री.प्रवीण निमजे शिक्षक, प्रामुख्याने उपस्थित होते तर या कार्यशाळेच्या माध्यमातून शाळा व्यव. समितीची रचना, कार्य व जबाबदाऱ्या तसेच गुणवत्तापुर्ण शिक्षण, बालकाचे हक्क व सुरक्षितता आणि शैक्षणिक विकास आराखडा या विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेगाव बु केंद्रांतर्गत येणाऱ्या केंद्रातील 9 शाळांचे 54 सदस्य उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन श्री प्रवीण निमजे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. विजय बरडे यांनी केले.......