पोलिसांची दादागिरी चक्क लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभास धरतात वेठीस

 पोलिसांची दादागिरी

चक्क लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभास धरतात वेठीस


 राजेंद्र डोईफोडे

सविस्तर

आज दिनांक 22/3/2022 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास देऊलगावराजा पोलीस स्टेशन मध्ये  महाराष्ट्र न्यूजचे संपादक राजेंद्र जी डोईफोडे हे त्यांच्या मित्रा सोबत कामानिमित्त गेले असता त्यांना तेथे एका पोलीस कर्मचारी कडून आपण कोण व येथे कशासाठी आलात अश्या स्वरूपाची विचारणा करण्यात आली,

राजेंद्र डोईफोडे यांनी रीतसर मी पत्रकार असून त्यांचे ओळखपत्र दाखुउन सुद्धा त्यांना अपशब्दात त्यांची अहवेलना करण्यात आली आणि हा सर्व प्रसंग देऊलगावराजा पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांच्या समोर घडला,

नंतर राजेंद्र डोईफोडे यांनी इतर पत्रकार बांधवाना फोन वरून ही माहिती दिली असता असभ्य वर्तणूक देणाऱ्या त्या पोलीस कर्मचारी व वरिस्ट अधिकारी यांनी डोईफोडे यांना वातावरण निर्मिती करू नका असे सांगण्यात आले,

तर लोकशाही मराठी पत्रकार संघाचे जिल्हा पदाधिकारी व तालुका कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी यांनी तात्काळ पोलीस स्टेशन ला भेट देऊन झालेल्या प्रकारा विषयी पोलिसांच्या वागणुकीबाबत खेद व्यक्त केला ,

 पत्रकार हे नेहमीच पोलीस यंत्रणेला साथ देतात पण पोलिसांची वागणूक ही पत्रकारा विषयी वेगळीच बघायला मिळत आहे त्याबद्दल सर्व पत्रकार या घटनेचा जाहीर निषेध करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler